ग्लोबल होणार्‍या नवीमुंबईला रेल्वेच्या अपुर्‍या सुविधा

ग्लोबल होणार्‍या नवीमुंबईला रेल्वेच्या अपुर्‍या सुविधा

24 फेब्रुवारीरेल्वे बजेट आलं की हार्बरने प्रवास करणा-या प्रवाश्यांना अशा वाटते की आपला खडतर प्रवास सुरळीत होईल. पण प्रत्येक बजेटने हार्बर प्रवाशांची निराशा केली. हार्बरलाईनने प्रवास करणार्‍या नवीमंुबईकरांच्या या बजेटकडून खूप अपेक्षा आहे. हार्बर रेल्वे ही सुरुवातीला सीएसटी ते मानखुर्द पर्यंत धावत होती. नवीमंुबई शहर वसल्या नंतर अनेक वर्षांनी ही रेल्वे प्रवाश्यांचा दिमतीला आली, पण रेल्वेनी नवीमुंबईत प्रवेश केला त्या दिवसापासून आजपर्यंत रेल्वेच्या सुविधांमध्ये काही सुधार झालेला नाही. हार्बर रेल्वेच्या गाड्या आहेत 9 डब्यांच्या. प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढल्याने आता 12 डब्यांच्या लोकल्सची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हार्बर प्रवाशांकडून रेल्वे अधिभार वसूल करत आहे. तर ठाणे-पनवेल, ठाणे-नेरुळ या मार्गावर गाड्या वाढवण्याची गरज आहे. तर लोकल्सच्या एकूणच फेर्‍या वाढणं गरजेचं आहे. तसेच सोबतच तिकीट खिडक्या अपुर्‍या आहेत यामुळेच प्रवाशांच्या लांबचलांब रांगा स्टेशन बाहेर पहायला मिळतात. विशेष म्हणजे स्टेशन्सवर स्मार्ट कार्ड आहेत पण त्याची मशीन मात्र बंद अवस्थेत आहेत.हार्बर लाईनवर सर्वात जास्त उत्पन्न ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल, ठाणे-नेरुळ या मार्गातील रेल्वेवर मिळतं पण सुविधा मात्र तुटपंुज्या आहेत. यासगळ्यांसोबत 425 कोटी रुपयांवरुन 1500 कोटी रुपयांवर पोहचलेला आणि सध्या अर्धवट स्थितीत असलेला नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प अजुनही रेल्वेच्या बोगीत अडकुन पडला आहे. तर दुसरीकडे नवीमंुबई विमानतळाला हिरवा सिग्नल मिळाला, सिडको तिसरी नवीमंुबई उभारतेय पण सर्वांना महत्वाची असलेली रेल्वे सेवा अजुनही जुनी कात टाकत नाही.

  • Share this:

24 फेब्रुवारी

रेल्वे बजेट आलं की हार्बरने प्रवास करणा-या प्रवाश्यांना अशा वाटते की आपला खडतर प्रवास सुरळीत होईल. पण प्रत्येक बजेटने हार्बर प्रवाशांची निराशा केली. हार्बरलाईनने प्रवास करणार्‍या नवीमंुबईकरांच्या या बजेटकडून खूप अपेक्षा आहे.

हार्बर रेल्वे ही सुरुवातीला सीएसटी ते मानखुर्द पर्यंत धावत होती. नवीमंुबई शहर वसल्या नंतर अनेक वर्षांनी ही रेल्वे प्रवाश्यांचा दिमतीला आली, पण रेल्वेनी नवीमुंबईत प्रवेश केला त्या दिवसापासून आजपर्यंत रेल्वेच्या सुविधांमध्ये काही सुधार झालेला नाही. हार्बर रेल्वेच्या गाड्या आहेत 9 डब्यांच्या. प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढल्याने आता 12 डब्यांच्या लोकल्सची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हार्बर प्रवाशांकडून रेल्वे अधिभार वसूल करत आहे.

तर ठाणे-पनवेल, ठाणे-नेरुळ या मार्गावर गाड्या वाढवण्याची गरज आहे. तर लोकल्सच्या एकूणच फेर्‍या वाढणं गरजेचं आहे. तसेच सोबतच तिकीट खिडक्या अपुर्‍या आहेत यामुळेच प्रवाशांच्या लांबचलांब रांगा स्टेशन बाहेर पहायला मिळतात. विशेष म्हणजे स्टेशन्सवर स्मार्ट कार्ड आहेत पण त्याची मशीन मात्र बंद अवस्थेत आहेत.

हार्बर लाईनवर सर्वात जास्त उत्पन्न ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल, ठाणे-नेरुळ या मार्गातील रेल्वेवर मिळतं पण सुविधा मात्र तुटपंुज्या आहेत. यासगळ्यांसोबत 425 कोटी रुपयांवरुन 1500 कोटी रुपयांवर पोहचलेला आणि सध्या अर्धवट स्थितीत असलेला नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प अजुनही रेल्वेच्या बोगीत अडकुन पडला आहे. तर दुसरीकडे नवीमंुबई विमानतळाला हिरवा सिग्नल मिळाला, सिडको तिसरी नवीमंुबई उभारतेय पण सर्वांना महत्वाची असलेली रेल्वे सेवा अजुनही जुनी कात टाकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 03:53 PM IST

ताज्या बातम्या