खासदार जेव्हा आमदारांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतात!

खासदार जेव्हा आमदारांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतात!

बारणे ह्यांनी आपण जनतेच्या हितासाठी दोन पाऊल मागे येत असल्याचे म्हटलं आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 8 एप्रिल : अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर, मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज मनोमिलन झालं आणि युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिलासा मिळाला. निवडणुकीत जिंकायचं असल्याने शिवसेनेचे खासदार बारणे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतले.

या मतदार संघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे ह्यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर भ्रष्टाचारी आणि सत्तेची धुंदी असलेला आमदार असे अनेक   गंभीर आरोप केले होते. गेली चार वर्ष भांडणाच्या काळात हे आरोप झाले होते. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती झाली आणि सगळीच परिस्थिती बदलली.

जगताप यांची नाराजी दूर करण्यासाठी बारणे प्रयत्नशील होते. त्याचाच एक भाग म्हणून हे सगळे आरोप मागे घेत असल्याचं जाहीर करत बारणे ह्यांनी आपण जनतेच्या हितासाठी दोन पाऊल मागे येत असल्याचे म्हटलं आहे.

तर आपणही सगळे हेवेदावे बाजूला सारून देश हितासाठी एकत्र आल्याची भावना आमदार जगताप ह्यांनी यावेळी बोलून दाखवली. या मनोमिलनामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार ह्यांच्या अडचणीत वाढ होणार असं बोललं जातंय.

'मी याआधी गैरसमज झाल्याने भाजपवर आरोप केले होते,' असं मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मान्य केलं होतं. पण त्यानंतरही शिवसेना-भाजप युतीतील वाद मिटताना दिसत नव्हते. अखेर वरच्या पातळीवरून हालचाली झाल्याने अखेर वाद मिटविण्यात आला.

First published: April 8, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading