कसाबची फाशीची शिक्षा कायम

कसाबची फाशीची शिक्षा कायम

21 फेब्रुवारी26 /11 च्या हल्ल्यातला मुख्य आरोपी मोहम्मद अजमल कसाबची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली आहेत. यापूर्वी विशेष सेशन्स कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा दिली होती. आज मुंबई हायकोर्टानं ही रेअर ऑफ द रेअरेस्ट केस असल्याचं सांगत फाशीची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती रंजना देसाई आणि आर वी मोरे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आज हायकोर्टात सुनावणीच्या वेळेस कसाब व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे हजर होता. कसाबला सात विविध प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले आहे. एकूण सात गुन्ह्यांसाठी कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्या हत्येसाठीही कसाबला दोषी ठरवण्यात आलंय. फाशीच्या शिक्षेविरोधात कसाब सुप्रीम कोर्टात अपील करू शकतो. मात्र कसाबला फाशीची शिक्षा सुनावतानाच 26/11 च्या हल्ल्यातील आणखी दोन आरोपी फहीम आणि सबाउद्दीन या दोघांना मात्र संशयाचा फायदा मिळाला. या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निर्णयाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.दरम्यान निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊ कसाबला अजून एक संधी आहे आणि तो सुप्रीम कोर्टात अपील करू शकतो अस कसाबच्या वकील फरहाना शहा यांनी म्हटलं आहे.कसाबचा निकाल सुनावताना कोर्टानं पुढील बाबी मांडल्या " कसाबने साळसकर, कामटे आणि करकरेंना मारलंय, यावर आम्ही शिक्कामोर्तब केलं. कसाब स्वतः सातजणांच्या हत्येला जबाबदार आहे. कसाब आणि त्याचे साथीदारांनी एकूण 66 जणांना मारले. या सर्व कटामध्ये कसाबचा महत्त्वाचा सहभाग होता, आम्ही त्याची फाशीची शिक्षा कायम करत आहोत. " कसाबला फाशीऐवजी त्याला जन्मठेप देण्यात यावी, यासाठी कसाबच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. मात्र त्याला फाशी झालीच आता पुढच्या पर्यायांचा विचार कसाब आणि त्याचे वकील करताहेत. आजच्या या निकालाक़डे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. कसाबची फाशीची शिक्षा कायम होते, की काही गुन्ह्यात त्याला मोकळीक मिळते, याबाबत उत्सुकता होती. मात्र हायकोर्टानं त्याच्या शिक्षेत वाढच केली आहे. कसाबला कोणत्या गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा 1) सात व्यक्तींची कट रचून हत्या केल्याबद्दल फाशी 2) भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल फाशी आणि 10 हजारांचा दंड 3) बंदी असलेल्या लष्कर ए तोयबासारख्या संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी कृत्य केल्याबद्दल फाशी4) अमरसिंग सोलंकी, अंबादास पवार, तुकाराम ओंबळे, विनोद गुप्ता, अशोक कामटे यांची हत्या केल्याबद्दल फाशी. हायकोर्टातल्या खटल्याचा घटनाक्रम-18 ऑक्टोबर, 2010 : हायकोर्टातल्या खटल्याला सुरुवात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कसाबची हजेरी-19 ऑक्टोबर, 2010 : सुनावणी दरम्यान कसाब कॅमेर्‍यावर थुंकला, कोर्टानं दिली कसाबला समज-25 ऑक्टोबर, 2010 : कसाब आणि अबू ईस्माईल यांच्या दहशतवादी कृत्याचं सीसीटिव्ही फुटेज हायकोर्टानं तपासलं-27 ऑक्टोबर, 2010 : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबसाठी फाशीचीच शिक्षा कशी योग्य आहे याबद्दलचा युक्तीवाद मांडला -23 नोव्हेंबर 2010 : कसाबचे फोटो 'मॉर्फ' केला असल्याचा त्याचे वकील सोलकर यांचा आरोप-07 डिसेंबर 2010 : हेमंत करकरे आणि इतर पोलिसांना मारल्याचा आरोप कसाबने फेटाळला-05 जानेवारी 2011 : सबाउद्दीन आणि फहीम यांचा 26/11 मध्ये सहभाग असल्याचा निकम यांचा आरोप-06 जानेवारी 2011: फहीमचे वकील मोकाशी यांनी निकम यांचे आरोप फेटाळत, पुरावे ठोस नसल्याचं म्हटलं-13 जानेवारी 2011 : सबाउद्दीनचे वकील एजाज नक्वी यांचा सबाउद्दीन निर्दोष असल्याचा दावा-07 फेब्रुवारी 2011 : 21 फेब्रुवारी पर्यंत निकाल पुढे ढकलण्यात आला-21 फेब्रुवारी 2011 : अजमलकसाबची फाशीची शिक्षा कायम, फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांची निर्दोष सुटका

  • Share this:

21 फेब्रुवारी

26 /11 च्या हल्ल्यातला मुख्य आरोपी मोहम्मद अजमल कसाबची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली आहेत. यापूर्वी विशेष सेशन्स कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा दिली होती. आज मुंबई हायकोर्टानं ही रेअर ऑफ द रेअरेस्ट केस असल्याचं सांगत फाशीची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती रंजना देसाई आणि आर वी मोरे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आज हायकोर्टात सुनावणीच्या वेळेस कसाब व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे हजर होता.

कसाबला सात विविध प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले आहे. एकूण सात गुन्ह्यांसाठी कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्या हत्येसाठीही कसाबला दोषी ठरवण्यात आलंय. फाशीच्या शिक्षेविरोधात कसाब सुप्रीम कोर्टात अपील करू शकतो. मात्र कसाबला फाशीची शिक्षा सुनावतानाच 26/11 च्या हल्ल्यातील आणखी दोन आरोपी फहीम आणि सबाउद्दीन या दोघांना मात्र संशयाचा फायदा मिळाला. या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निर्णयाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.

दरम्यान निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊ कसाबला अजून एक संधी आहे आणि तो सुप्रीम कोर्टात अपील करू शकतो अस कसाबच्या वकील फरहाना शहा यांनी म्हटलं आहे.

कसाबचा निकाल सुनावताना कोर्टानं पुढील बाबी मांडल्या " कसाबने साळसकर, कामटे आणि करकरेंना मारलंय, यावर आम्ही शिक्कामोर्तब केलं. कसाब स्वतः सातजणांच्या हत्येला जबाबदार आहे. कसाब आणि त्याचे साथीदारांनी एकूण 66 जणांना मारले. या सर्व कटामध्ये कसाबचा महत्त्वाचा सहभाग होता, आम्ही त्याची फाशीची शिक्षा कायम करत आहोत. " कसाबला फाशीऐवजी त्याला जन्मठेप देण्यात यावी, यासाठी कसाबच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. मात्र त्याला फाशी झालीच आता पुढच्या पर्यायांचा विचार कसाब आणि त्याचे वकील करताहेत. आजच्या या निकालाक़डे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. कसाबची फाशीची शिक्षा कायम होते, की काही गुन्ह्यात त्याला मोकळीक मिळते, याबाबत उत्सुकता होती. मात्र हायकोर्टानं त्याच्या शिक्षेत वाढच केली आहे.

कसाबला कोणत्या गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा

1) सात व्यक्तींची कट रचून हत्या केल्याबद्दल फाशी 2) भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल फाशी आणि 10 हजारांचा दंड 3) बंदी असलेल्या लष्कर ए तोयबासारख्या संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी कृत्य केल्याबद्दल फाशी4) अमरसिंग सोलंकी, अंबादास पवार, तुकाराम ओंबळे, विनोद गुप्ता, अशोक कामटे यांची हत्या केल्याबद्दल फाशी.

हायकोर्टातल्या खटल्याचा घटनाक्रम

-18 ऑक्टोबर, 2010 : हायकोर्टातल्या खटल्याला सुरुवात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कसाबची हजेरी-19 ऑक्टोबर, 2010 : सुनावणी दरम्यान कसाब कॅमेर्‍यावर थुंकला, कोर्टानं दिली कसाबला समज-25 ऑक्टोबर, 2010 : कसाब आणि अबू ईस्माईल यांच्या दहशतवादी कृत्याचं सीसीटिव्ही फुटेज हायकोर्टानं तपासलं-27 ऑक्टोबर, 2010 : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबसाठी फाशीचीच शिक्षा कशी योग्य आहे याबद्दलचा युक्तीवाद मांडला -23 नोव्हेंबर 2010 : कसाबचे फोटो 'मॉर्फ' केला असल्याचा त्याचे वकील सोलकर यांचा आरोप-07 डिसेंबर 2010 : हेमंत करकरे आणि इतर पोलिसांना मारल्याचा आरोप कसाबने फेटाळला-05 जानेवारी 2011 : सबाउद्दीन आणि फहीम यांचा 26/11 मध्ये सहभाग असल्याचा निकम यांचा आरोप-06 जानेवारी 2011: फहीमचे वकील मोकाशी यांनी निकम यांचे आरोप फेटाळत, पुरावे ठोस नसल्याचं म्हटलं-13 जानेवारी 2011 : सबाउद्दीनचे वकील एजाज नक्वी यांचा सबाउद्दीन निर्दोष असल्याचा दावा-07 फेब्रुवारी 2011 : 21 फेब्रुवारी पर्यंत निकाल पुढे ढकलण्यात आला-21 फेब्रुवारी 2011 : अजमलकसाबची फाशीची शिक्षा कायम, फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांची निर्दोष सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 06:30 PM IST

ताज्या बातम्या