स्पेक्ट्रम प्रकरणी कलाईगनार टीव्हीच्या ऑफिसेसवर सीबीआयचा छापा

स्पेक्ट्रम प्रकरणी कलाईगनार टीव्हीच्या ऑफिसेसवर सीबीआयचा छापा

18 फेब्रुवारीडीएमके प्रमुख करुणानिधी यांच्या कुटुंबातल्या काही व्यक्ती 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकल्या आहेत. सीबीआयने काल मध्यरात्री चेन्नईमधल्या कलाईगनार टीव्हीच्या ऑफिसेसवर छापा टाकला. कलाईगनार टीव्ही करुणानिधी यांच्या मालकीचा आहे. याशिवाय कलाईगनार टीव्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद कुमार यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला. मध्यरात्री सुरु झालेली ही कारवाई पहाटे पाचपर्यंत सुरु होती. तर करुणानिधी यांची मुलगी खासदार कनिमोळी यांचीही याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं बोललं जातं आहे. पण याप्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं कनिमोळी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

18 फेब्रुवारी

डीएमके प्रमुख करुणानिधी यांच्या कुटुंबातल्या काही व्यक्ती 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकल्या आहेत. सीबीआयने काल मध्यरात्री चेन्नईमधल्या कलाईगनार टीव्हीच्या ऑफिसेसवर छापा टाकला. कलाईगनार टीव्ही करुणानिधी यांच्या मालकीचा आहे. याशिवाय कलाईगनार टीव्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद कुमार यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला. मध्यरात्री सुरु झालेली ही कारवाई पहाटे पाचपर्यंत सुरु होती. तर करुणानिधी यांची मुलगी खासदार कनिमोळी यांचीही याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं बोललं जातं आहे. पण याप्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं कनिमोळी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 05:17 PM IST

ताज्या बातम्या