कसाबची सुनावणी सोमवारी

कसाबची सुनावणी सोमवारी

सुधाकर कांबळे, मुंबई05 फेब्रुवारी मुंबईतील दहशतवादी हल्याचा खटला मुंबई हायकोर्टात सुरु होता. हा खटला काही दिवसांपूर्वी संपला. या खटल्याचा निकाल येत्या सोमवारी येण्याची शक्यता आहे. कसाबलला किती प्रकरणात फाशी कायम राहते हे निकालातून स्पष्ट होणार आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अजमल कसाबला मुंबईतल्या विशेष कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. तर फईम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांना निर्दोष सोडलं होतं. आता कसाबविरुद्ध हायकोर्टात खटला सुरु आहे त्याची सुनावणी नुकतीच संपली. सोमवारी म्हणजे सात फेब्रुवारीला हायकोर्ट त्यावर निकाल देणार आहे. साडेतीन महिने चाललेल्या या सुनावणीच्या दरम्यान केवळ तीन-चार वेळाच तो सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसमोर बसला होता. कसाबचे वकील अमीन सोलकर यांनी त्याच्या वतीनं अनेक मुद्द मांडलेत.निर्दोष सोडलेल्या फईमच्या विरोधात चार महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. त्यात अबू इस्माईलच्या खिशात सापडलेला नकाशा फईमच्या हस्ताक्षरातला आहे. नकाशा त्याच्या कार्गो पॅन्टच्या खालच्या खिशात होता त्यामुळे त्याला रक्त लागलं नाही. कसाबच्या कबुली जबाबात या दोघांची नावं आहेत. फईमकडे पाकिस्तानचा पासपोर्ट सापडला. त्याबाबत त्याला पाक कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे या दोघांना शिक्षा व्हावी अशी सरकारी वकिलांची मागणी आहे. सात तारखेला हायकोर्ट काय शिक्षा सुनावली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

  • Share this:

सुधाकर कांबळे, मुंबई

05 फेब्रुवारी

मुंबईतील दहशतवादी हल्याचा खटला मुंबई हायकोर्टात सुरु होता. हा खटला काही दिवसांपूर्वी संपला. या खटल्याचा निकाल येत्या सोमवारी येण्याची शक्यता आहे. कसाबलला किती प्रकरणात फाशी कायम राहते हे निकालातून स्पष्ट होणार आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अजमल कसाबला मुंबईतल्या विशेष कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. तर फईम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांना निर्दोष सोडलं होतं. आता कसाबविरुद्ध हायकोर्टात खटला सुरु आहे त्याची सुनावणी नुकतीच संपली. सोमवारी म्हणजे सात फेब्रुवारीला हायकोर्ट त्यावर निकाल देणार आहे. साडेतीन महिने चाललेल्या या सुनावणीच्या दरम्यान केवळ तीन-चार वेळाच तो सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसमोर बसला होता. कसाबचे वकील अमीन सोलकर यांनी त्याच्या वतीनं अनेक मुद्द मांडलेत.

निर्दोष सोडलेल्या फईमच्या विरोधात चार महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. त्यात अबू इस्माईलच्या खिशात सापडलेला नकाशा फईमच्या हस्ताक्षरातला आहे. नकाशा त्याच्या कार्गो पॅन्टच्या खालच्या खिशात होता त्यामुळे त्याला रक्त लागलं नाही. कसाबच्या कबुली जबाबात या दोघांची नावं आहेत. फईमकडे पाकिस्तानचा पासपोर्ट सापडला. त्याबाबत त्याला पाक कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे या दोघांना शिक्षा व्हावी अशी सरकारी वकिलांची मागणी आहे. सात तारखेला हायकोर्ट काय शिक्षा सुनावली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 04:32 PM IST

ताज्या बातम्या