गुरुनानक : समाजसुधारणावादी संत

गुरुनानक : समाजसुधारणावादी संत

13 नोव्हेंबर हा दिवस शीख संत गुरुनानक यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने 'सलाम महाराष्ट्र'मध्ये संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.अशोक कामत आले होते. त्यांनी पुण्याच्या शाहू आणि गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पुणे विद्यापीठात ते श्रीनामदेव अध्यासनाचे प्रमुख होते.अध्यापन आणि संशोधन-मार्गदर्शन ते एका सामाजिक जाणीवेतून करत आले आहेत. त्यांच्या व्यासंगाला अखिल भारतीय संतविषयक लेखनाचा भव्य कॅन्‌व्हास लाभला आहे. गुरुनानकांच्या जयंती निमित्ताने ते नानक देवांच्या जीवनप्रवाहाविषयी बोलले. डॉ. अशोक कामत सांगतात - नानक देवांचा काळ हा 1479 ते 1539 असा आहे. वायव्य भारतामध्ये नवव्या शतकापासून अनेक आक्रमणं सुरू झाली होती. बाबराची स्वारी ज्या काळात आली, त्याकाळात नानक देवांचा संचार वायव्य भारतात होता. नानक देवांची त्याकाळाचं जे वर्णन केलं आहे ते गुरुग्रंथसाहेबमध्ये जपुजी आहे त्यात त्यांनी वर्णन करून ठेवलं आहे. त्याकाळाचं वर्णन करताना नानक देव म्हणतात, 'रक्तपिपासू सिंहासारखे शासक होते. जे अधिकारी शासन करत आहेत ते चाव-या कुत्र्यासारखे आहेत. त्यात प्रजाजन अंधकारात आहेत. पुरुष हे शिकारी बनले आहेत. स्त्रिया दुर्बल झाल्या आहेत. स्त्रियांची प्रतिष्ठा हा शब्द संपलेला आहे. कुत्र्यांच्या सवयी माणसांनी घेतलेल्या आहेत.' अशा भेदक शब्दात नानकांनी त्या काळाचं वर्णन केलं आहे. नानकांनी नंतर संन्यास जीवनचा मार्ग स्वीकारला. पण त्यांनी आधी संसार केला होता. नानक भगवंताकडे किंवा संसाराकडे पाठ फिरवून परमार्थाकडे वळलेले नाहीत. आधी प्रपंच आणि मग परमार्थ असं त्यांचं जीवन आहे. 1487 साली त्यांचा विवाह झाला होता. 1494 साली त्यांना श्रीचंद नावाचा मुलगा झाला. तर 1496 मध्ये त्यांना लक्ष्मीदास नावाचा मुलगा झाला आहे. मर्दान हा मुसलमान श्ष्यि त्यांच्या सर्वात जवळचा आणि लाडका होता. तो त्यांच्या सावलीसारखा बरोबर असायचा. त्यांनी अखंडपणे प्रवास करून त्याकाळचं लोकजीवन जागवलं. अंधश्रद्धेच्या विरोधात ते बोलायचे. लोक कुठे चुकतायत हे ते समाजावून सांगायचे. ईश्वर एक आहे ही त्यांची शिकवण होती. सत्य, प्रेम आणि एकतेची त्यांनी शिकवण दिली. नानकांचा कर्मकांडाला विरोध होता. स्त्री स्वातंत्र्याचा आणि शांततेचा त्यांनी पुरस्कार केला आहे. ते समाजसुधारणावादी संत होते.

  • Share this:

First published: November 13, 2008, 1:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या