माहिती उघड होण्याच्या दडपणाखाली शाळा पेटवली

माहिती उघड होण्याच्या दडपणाखाली शाळा पेटवली

संदीप काळे, नांदेड 21 जानेवारीमाहितीच्या अधिकाराने अनेकांना हतबल केलं. त्यामुळे आर.टी.आय कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडीत मात्र वेगळाच प्रकार उघड झाला. माहितीच्या अधिकाराखाली खरी माहिती समोर येऊ द्यायची नाही या हेतूनं काही अज्ञातांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिली. ज्यामध्ये 1934 पासूनची सगळी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. कुंडलवाडीची जिल्हा परिषद शाळा सगळ्यात जुनी आणि प्रतिष्ठेची शाळेच्या माध्यमातून असलेली रेकॉर्ड देण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे अर्ज शाळेकडे उपलब्ध आहेत. शिवाय निवडणुकीच्या काळात जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आधार घेतला जातो तो शाळेकडूनच पण आता या सगळ्या कागदपत्रांची राख झाली आहे. शिक्षकांचं रेकॉर्ड, मुलांच्या ऍडमिशनची कागदपत्र, हजेरी पत्रकं, शिक्षकांच्या फाईल्स सगळंच जळून गेल्या आहेत. जिल्हा परिषदेने या बाबतची गंभीर दखल घेतली. या घटनेत सहभागी असणारे अधिकारी आणि शिक्षकांची गय केली जाणार नाही, असं जिल्हा परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. नांदेड जिल्ह्यात अशा चार पाच प्रकारच्या घटना घडल्यात पण कुणालाही ताब्यात घेतललं नाही. एकीकडे माहितीचा अधिकार सत्यासाठी ढाल आहे असं म्हटलं जातं पण दुसरीकडे माहिती नष्ट करण्यासाठी ही अघोरी पध्दत वापरली जात आहे.

  • Share this:

संदीप काळे, नांदेड

21 जानेवारी

माहितीच्या अधिकाराने अनेकांना हतबल केलं. त्यामुळे आर.टी.आय कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडीत मात्र वेगळाच प्रकार उघड झाला. माहितीच्या अधिकाराखाली खरी माहिती समोर येऊ द्यायची नाही या हेतूनं काही अज्ञातांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिली. ज्यामध्ये 1934 पासूनची सगळी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

कुंडलवाडीची जिल्हा परिषद शाळा सगळ्यात जुनी आणि प्रतिष्ठेची शाळेच्या माध्यमातून असलेली रेकॉर्ड देण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे अर्ज शाळेकडे उपलब्ध आहेत. शिवाय निवडणुकीच्या काळात जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी आधार घेतला जातो तो शाळेकडूनच पण आता या सगळ्या कागदपत्रांची राख झाली आहे. शिक्षकांचं रेकॉर्ड, मुलांच्या ऍडमिशनची कागदपत्र, हजेरी पत्रकं, शिक्षकांच्या फाईल्स सगळंच जळून गेल्या आहेत. जिल्हा परिषदेने या बाबतची गंभीर दखल घेतली. या घटनेत सहभागी असणारे अधिकारी आणि शिक्षकांची गय केली जाणार नाही, असं जिल्हा परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. नांदेड जिल्ह्यात अशा चार पाच प्रकारच्या घटना घडल्यात पण कुणालाही ताब्यात घेतललं नाही. एकीकडे माहितीचा अधिकार सत्यासाठी ढाल आहे असं म्हटलं जातं पण दुसरीकडे माहिती नष्ट करण्यासाठी ही अघोरी पध्दत वापरली जात आहे.

First published: January 21, 2011, 2:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या