विहीरीत पडलेला बिबट्या जंगलात पळला

विहीरीत पडलेला बिबट्या जंगलात पळला

18 जानेवारीअहमदनगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील संजय नांगरे या शेतकर्‍याच्या शेतातील विहीरीत पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला. या बिबट्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. या बिबट्याला वाचवण्यासाठी नागरीकांनी बांबूचा सापळाही टाकला होता. पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागवला. मोठ्या शर्थीनं बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळालं. त्यानंतर हा बिबट्या जंगलात पळून गेला.

  • Share this:

18 जानेवारी

अहमदनगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील संजय नांगरे या शेतकर्‍याच्या शेतातील विहीरीत पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला. या बिबट्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. या बिबट्याला वाचवण्यासाठी नागरीकांनी बांबूचा सापळाही टाकला होता. पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागवला. मोठ्या शर्थीनं बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळालं. त्यानंतर हा बिबट्या जंगलात पळून गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 05:12 PM IST

ताज्या बातम्या