कसाबच्या शिक्षेची अंतिम सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत

कसाबच्या शिक्षेची अंतिम सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत

17 जानेवारीमुंबईत झालेल्या 26/11 हल्लयातील मुख्य आरोपी अजमल कसाब याच्याबाबतची मुंबई हायकोर्टामधला अंतिम युक्तिवाद संपला आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी विशेष कोर्टानं काही प्रकरणात कसाबला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कसाबची फाशीची शिक्षा कायम राहण्यासाठी पोलिसांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला. या प्रकरणी आता मुंबई हायकोर्ट 7 फेब्रुवारीला निकाल देण्याची शक्यता आहे. फाशी सारख्या शिक्षेत ती कायम करण्यासाठी हायकोर्टात अर्ज करावा लागतो ही एक प्रक्रिया आहे. पण यावेळी कसाबच्या वकिलांनी त्याच्या वयाचा विचार करावा तसेच त्याने कोणत्या परिस्थीत हा गुन्हा केला याचा विचार केला जाव असं अपील हायकोर्टाला केलं आहे. कसाब याला पाच गुन्ह्यात फाशी झाली आहे यामुळे हायकोर्ट किती गुन्ह्यात त्याची फाशी कायम करतं. हे येत्या 7 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.

  • Share this:

17 जानेवारी

मुंबईत झालेल्या 26/11 हल्लयातील मुख्य आरोपी अजमल कसाब याच्याबाबतची मुंबई हायकोर्टामधला अंतिम युक्तिवाद संपला आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी विशेष कोर्टानं काही प्रकरणात कसाबला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कसाबची फाशीची शिक्षा कायम राहण्यासाठी पोलिसांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला. या प्रकरणी आता मुंबई हायकोर्ट 7 फेब्रुवारीला निकाल देण्याची शक्यता आहे. फाशी सारख्या शिक्षेत ती कायम करण्यासाठी हायकोर्टात अर्ज करावा लागतो ही एक प्रक्रिया आहे. पण यावेळी कसाबच्या वकिलांनी त्याच्या वयाचा विचार करावा तसेच त्याने कोणत्या परिस्थीत हा गुन्हा केला याचा विचार केला जाव असं अपील हायकोर्टाला केलं आहे. कसाब याला पाच गुन्ह्यात फाशी झाली आहे यामुळे हायकोर्ट किती गुन्ह्यात त्याची फाशी कायम करतं. हे येत्या 7 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 10:18 AM IST

ताज्या बातम्या