काँग्रेसचं धर्माचं राजकारण विकिलीक्सचा नवा खुलासा

काँग्रेसचं धर्माचं राजकारण विकिलीक्सचा नवा खुलासा

11 डिसेंबरशहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या राजकारणाला आज नव्यानं सुरवात झाली. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी अंतुलेंप्रमाणेच संशय व्यक्त केला की करकरेंच्या मृत्यूमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असू शकतो. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस कसाबला मदत करत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. कविता करकरेंनीही दिग्विजय सिंग यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून शहिदांच्या मृत्यूचे राजकारण थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, विकिलीक्सने नव्यानं काही कागदपत्रं बाहेर काढली असून त्यातून अंतुलेंसारखे काँग्रेस नेते धर्माचे राजकारण करत असल्याचे पुढे आलं आहे. काँग्रेसच्या याच धर्माच्या राजकारणावर बोट ठेवण्यात आलं ते योगायोगाने आजच लीक झालेल्या विकिलीक्सच्या नव्या कागदपत्रांमधून. डेव्हिड मलफोर्ड हे अमेरिकेचे तत्कालीन राजदूत आपल्या गोपनीय अहवालात लिहितातकाँग्रेसने सुरुवातीला ए. आर. अंतुले यांच्या विधानापासून फारकत घेतली. पण त्यानंतर दोनच दिवसांनी काँग्रेसने विरोधाभासी निवेदन प्रसिद्ध केलं. त्यातून काँग्रेसचा काहीतरी कट दिसून येतो. दरम्यानच्या काळात अंतुलेंच्या विधानाला मुस्लीम समाजातून पाठिंबा मिळाला. आणि पुढच्या निवडणुकीत तो पाठिंबा कॅश करण्यासाठी काँग्रेसनं सुरुवातीचा नकार बदलून अंतुलेंच्या विधानाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

11 डिसेंबर

शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या राजकारणाला आज नव्यानं सुरवात झाली. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी अंतुलेंप्रमाणेच संशय व्यक्त केला की करकरेंच्या मृत्यूमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असू शकतो. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस कसाबला मदत करत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. कविता करकरेंनीही दिग्विजय सिंग यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून शहिदांच्या मृत्यूचे राजकारण थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, विकिलीक्सने नव्यानं काही कागदपत्रं बाहेर काढली असून त्यातून अंतुलेंसारखे काँग्रेस नेते धर्माचे राजकारण करत असल्याचे पुढे आलं आहे.

काँग्रेसच्या याच धर्माच्या राजकारणावर बोट ठेवण्यात आलं ते योगायोगाने आजच लीक झालेल्या विकिलीक्सच्या नव्या कागदपत्रांमधून. डेव्हिड मलफोर्ड हे अमेरिकेचे तत्कालीन राजदूत आपल्या गोपनीय अहवालात लिहितात

काँग्रेसने सुरुवातीला ए. आर. अंतुले यांच्या विधानापासून फारकत घेतली. पण त्यानंतर दोनच दिवसांनी काँग्रेसने विरोधाभासी निवेदन प्रसिद्ध केलं. त्यातून काँग्रेसचा काहीतरी कट दिसून येतो. दरम्यानच्या काळात अंतुलेंच्या विधानाला मुस्लीम समाजातून पाठिंबा मिळाला. आणि पुढच्या निवडणुकीत तो पाठिंबा कॅश करण्यासाठी काँग्रेसनं सुरुवातीचा नकार बदलून अंतुलेंच्या विधानाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2010 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...