11 डिसेंबर
मुंबईवर झालेला 26/11 च्या हल्ल्यातील शहीद एटीस चे प्रमुख हेमंत करकरे यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन येत होते असा गौप्यस्फोट काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडल्यानंतर करकरेंना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन येत होते, असं करकरे यांनी आपल्याला सांगितल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. 26/11 च्या हल्ल्याच्या दोन तास आधी करकरेंना आपण फोन केला होता. त्यांच्याशी आपलं बोलणंही झालं होतं. मात्र या दिवशी बोलणं होणं हा केवळ योगायोग होता असंही सिंग यांनी म्हटलं आहे. करकरेंच्या प्रामणिकपणाबद्दल सतत शंका घेतली जात होती. त्यामुळे करकरे व्यथित होते, असंही सिंग यांनी म्हटलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा