शिवसेनाप्रमुखांची कविता राऊतने भेट घेतली

शिवसेनाप्रमुखांची कविता राऊतने भेट घेतली

06 डिसेंबरआशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या कविता राऊतनं आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी कविताने ही भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे यांनी कविता राऊतच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच तिच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. कविताने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत 10 हजार मीटरमध्ये तर एशियन गेम्स स्पर्धेत 5 हजार मीटर स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलं होते. आणि आता तिचं लक्ष आहे ते 2012मध्ये होणार्‍या लंडन ऑलिम्पिकवर यासाठी तिने जोरदार सरावही सुरु केला आहे.मुंबईत शिवसेनाप्रमुखांची भेट घेतल्यानंतर कविता राऊत आज संध्याकाळी आपल्या मुळगावी नाशिकमध्ये दाखल झाली. दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स आणि चीनमध्ये झालेल्या एशियन्स गेम्समध्ये मेडल पटकावल्यानंतर कविता पहिल्यांदाच नाशिकमध्ये आली. यावेळी नाशिककरांनी तीचं जल्लोषात स्वागत केले. तिच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमी एकच गर्दी केली होती.

  • Share this:

06 डिसेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या कविता राऊतनं आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी कविताने ही भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे यांनी कविता राऊतच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच तिच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. कविताने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत 10 हजार मीटरमध्ये तर एशियन गेम्स स्पर्धेत 5 हजार मीटर स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलं होते. आणि आता तिचं लक्ष आहे ते 2012मध्ये होणार्‍या लंडन ऑलिम्पिकवर यासाठी तिने जोरदार सरावही सुरु केला आहे.

मुंबईत शिवसेनाप्रमुखांची भेट घेतल्यानंतर कविता राऊत आज संध्याकाळी आपल्या मुळगावी नाशिकमध्ये दाखल झाली. दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स आणि चीनमध्ये झालेल्या एशियन्स गेम्समध्ये मेडल पटकावल्यानंतर कविता पहिल्यांदाच नाशिकमध्ये आली. यावेळी नाशिककरांनी तीचं जल्लोषात स्वागत केले. तिच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमी एकच गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 02:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...