Elec-widget

ए राजा यांचा राजीनामा

ए राजा यांचा राजीनामा

14 नोव्हेंबरवादग्रस्त दूरसंचार मंत्री ए राजा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन आपला राजीनामा दिला. करूणानिधींच्या सांगण्यवरून ए राजा यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. द्रमुकचे राजा यांच्यावर एक लाख 76 हजार कोटी रुपयांच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप आहे. तसेच सीएजीच्या प्राथमिक अहवालात राजा दोषी आढळले आहे. पण ते द्रमुकचा दलित चेहरा असल्यामुळे त्यांच्यावर आता प्रर्यंत कोणतीही कारवाई करायला करुणानिधी तयार नव्हते. मागील आठवड्यात विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज याच एका मुद्द्यावरून बंद पाडले. त्यामुळे कोरियाहून परत आल्यानंतर पंतप्रधान राजांविषयीचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र ए राजा यांची काँग्रेस पक्षाला पाठराखण करावी लागली. कॅगच्या अहवालात राजा यांच्यावर थेट आरोप नसल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली होती. राजा यांनीसुद्धा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले होते. काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक उद्यापासून संसदेचे अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि अहमद पटेल यांनी डीएमके ए. राजांबाबत काय निर्णय घेतं त्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याबैठकीत काय निर्णय झाला. याबद्दल माहिती देण्यास ए.के.अँटोनी यांनी नकार दिला होता. तर हा मुद्दा संसदेत चर्चेत असल्याने त्यांच्यावर बाहेर भाष्य करणार नाही, असे सांगितले होते. दरम्यान ए.राजा यांनी दोनवेळा करुणानिधी यांची भेट घेतली. पण आपण राजीनामा देणार नसल्याचे ए. राजा यांनी स्पष्ट केले. करुणानिधी यांचाही हात - नितीन गडकरी या घोटाळ्यात फक्त ए.राजाच नाही तर काँग्रेसचे काही नेते आणि करुणानिधी यांचाही हात असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर

वादग्रस्त दूरसंचार मंत्री ए राजा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन आपला राजीनामा दिला.

करूणानिधींच्या सांगण्यवरून ए राजा यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

द्रमुकचे राजा यांच्यावर एक लाख 76 हजार कोटी रुपयांच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप आहे. तसेच सीएजीच्या प्राथमिक अहवालात राजा दोषी आढळले आहे.

पण ते द्रमुकचा दलित चेहरा असल्यामुळे त्यांच्यावर आता प्रर्यंत कोणतीही कारवाई करायला करुणानिधी तयार नव्हते.

मागील आठवड्यात विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज याच एका मुद्द्यावरून बंद पाडले.

त्यामुळे कोरियाहून परत आल्यानंतर पंतप्रधान राजांविषयीचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मात्र ए राजा यांची काँग्रेस पक्षाला पाठराखण करावी लागली. कॅगच्या अहवालात राजा यांच्यावर थेट आरोप नसल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली होती.

राजा यांनीसुद्धा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले होते.

काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक

उद्यापासून संसदेचे अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि अहमद पटेल यांनी डीएमके ए. राजांबाबत काय निर्णय घेतं त्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

याबैठकीत काय निर्णय झाला. याबद्दल माहिती देण्यास ए.के.अँटोनी यांनी नकार दिला होता. तर हा मुद्दा संसदेत चर्चेत असल्याने त्यांच्यावर बाहेर भाष्य करणार नाही, असे सांगितले होते.

दरम्यान ए.राजा यांनी दोनवेळा करुणानिधी यांची भेट घेतली. पण आपण राजीनामा देणार नसल्याचे ए. राजा यांनी स्पष्ट केले.

करुणानिधी यांचाही हात - नितीन गडकरी

या घोटाळ्यात फक्त ए.राजाच नाही तर काँग्रेसचे काही नेते आणि करुणानिधी यांचाही हात असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...