ओबामांची बुलेटप्रूफ कार

ओबामांची बुलेटप्रूफ कार

ब्युरो रिपोर्ट,ओबामांच्या भारतातल्या प्रवासात त्यांची खास बुलेटफ्रूफ कार त्यांच्या सोबत आहे. लोकांना ओबामांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता आहे. त्यात भर पडलीय ती ओबामांच्या कारची. ओबामांची बुलेटप्रूफ कार कुठल्याही बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण करणारी अभेद्य कार आहे. कुठल्याही बाँबस्फोटाचा परिणाम या कारवर होऊ शकत नाही. बाहेरचा प्रकाश मर्जीशिवाय आत येणं अशक्य. म्हटलं तर घर , म्हटलं तर ऑफिस. सर्व सुविधा कारमध्ये आहेत. रस्त्यावर कार असताना कुणी समोर यायची हिंमत करू शकत नाही. आणि असं काही झालं, तर ही कार एकदम हिंसक बनते. म्हणूनच कारचं नाव आहे डबिस्ट. जनरल मोटर कंपनीची ही कार्डिलॅक 1 लिमोझिन. एकदम आरामदायी आणि सुरक्षित. कारची लांबी 18 फूट तर उंची 5फूट 10 इंच. डिझेलवर चालणारी ही कार 15 सेंकदात ताशी 15 किलोमीटर वेग घेऊ शकते. कारची किंमत 2 कोटी 13 लाख रुपये आहे. कारमध्ये 2.6टनाचं आर्मर प्लेटिंग आहे. त्यामुळे कुठलाही रासायनिक हल्ला किंवा गोळी कारला भेदू शकत नाही. कारच्या काचा बुलेटप्रूफ आहेत. कारची बॉडी ऍल्युमिनियम, टायटॅनियम, सॅरॅमिक एकत्र करून बनवली आहे. कारच्या खालच्या बाजूला बाँब ठेवून बाँबस्फोट केला तरीही राष्ट्राध्यक्षांच्या केसालाही धक्का लागणार नाही. कुठल्याही स्फोटाला नाकाम करण्यासाठी 5 इंचाची स्टीलची प्लेट लावलीय. पेट्रोलच्या टाकीतही आर्मर प्लेटिंग आहे.याशिवाय कारवरच्या खास प्लेटिंगमुळे कारचं आगीपासून संरक्षण होतं. कायमच हिटलिस्टवर असणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एवढी सुरक्षा तर असायलाच हवी. आणि याच कारमधून ओबामा भारत दर्शन करत आहेत.

  • Share this:

ब्युरो रिपोर्ट,

ओबामांच्या भारतातल्या प्रवासात त्यांची खास बुलेटफ्रूफ कार त्यांच्या सोबत आहे. लोकांना ओबामांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता आहे. त्यात भर पडलीय ती ओबामांच्या कारची.

ओबामांची बुलेटप्रूफ कार कुठल्याही बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण करणारी अभेद्य कार आहे. कुठल्याही बाँबस्फोटाचा परिणाम या कारवर होऊ शकत नाही. बाहेरचा प्रकाश मर्जीशिवाय आत येणं अशक्य. म्हटलं तर घर , म्हटलं तर ऑफिस. सर्व सुविधा कारमध्ये आहेत. रस्त्यावर कार असताना कुणी समोर यायची हिंमत करू शकत नाही. आणि असं काही झालं, तर ही कार एकदम हिंसक बनते. म्हणूनच कारचं नाव आहे डबिस्ट. जनरल मोटर कंपनीची ही कार्डिलॅक 1 लिमोझिन. एकदम आरामदायी आणि सुरक्षित. कारची लांबी 18 फूट तर उंची 5फूट 10 इंच. डिझेलवर चालणारी ही कार 15 सेंकदात ताशी 15 किलोमीटर वेग घेऊ शकते. कारची किंमत 2 कोटी 13 लाख रुपये आहे. कारमध्ये 2.6टनाचं आर्मर प्लेटिंग आहे. त्यामुळे कुठलाही रासायनिक हल्ला किंवा गोळी कारला भेदू शकत नाही. कारच्या काचा बुलेटप्रूफ आहेत. कारची बॉडी ऍल्युमिनियम, टायटॅनियम, सॅरॅमिक एकत्र करून बनवली आहे. कारच्या खालच्या बाजूला बाँब ठेवून बाँबस्फोट केला तरीही राष्ट्राध्यक्षांच्या केसालाही धक्का लागणार नाही. कुठल्याही स्फोटाला नाकाम करण्यासाठी 5 इंचाची स्टीलची प्लेट लावलीय. पेट्रोलच्या टाकीतही आर्मर प्लेटिंग आहे.याशिवाय कारवरच्या खास प्लेटिंगमुळे कारचं आगीपासून संरक्षण होतं. कायमच हिटलिस्टवर असणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एवढी सुरक्षा तर असायलाच हवी. आणि याच कारमधून ओबामा भारत दर्शन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2010 02:27 PM IST

ताज्या बातम्या