दिवाळी अंकांचे बदलते ट्रेण्ड्स

03 नोव्हेंबरशंभरी ओलांडलेल्या दिवाळी अंकाच्या परंपरेने या वर्षीही मोठ्या प्रमाणात बाजारात आपला ठसा उमटवला आहे. मराठी वाचक दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी अंकांची खरेदी करतात. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरु आहे. महागाईची झळ जरी दिवाळी अंकांना बसत असली तरी वाचकांच्या उत्साहात मात्र खंड पडलेला नाही. यंदा दिवाळी अंकांच्या किंमती 80-90 आणि 100 रुपयांच्या घरात आहेत. यंदाही जवळपास चारशे ते साडे चारशे अंक बाजारात आले आहेत. एकाच विषयाला वाहून घेतलेल्या अंकांचंही प्रमाण यंदा खूप आहे, असं मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी बोलताना सांगितलं. शिवाय अंकासोबत पुस्तक आणि डायरीची स्किमसुद्धा पहायला मिळतेय. बाजारात अधिष्ठान, हंस, चपराक हे साहित्यावरचे अंक आहेत. मौज, शब्द, अक्षर, दिपावली, साप्ताहिक सकाळ, मिळून सार्‍याजणी, ऋतुरंग, चारचौघी, स्पंदन, माहेर, मैत्रिण या अंकाना जास्त मागणी आहे. यंदा अंकांची मांडणीसोबत महत्वाचा फरक पडलाय तो कव्हरपेजमध्ये. नटींच्या फोटोपेक्षा रेखाचित्रांचा वापर जास्त दिसून येतोय. आयडिअल बुक हाऊसचे मंदार नेरुरकर यांनी बदललेल्या ट्रेंडविषयी बोलताना सांगितलं की यंदा वास्तू या विषयावर 5 अंक आहेत. इतकंच नाही तर वधूवर सूचक अंकही आलेयत.

  • Share this:

03 नोव्हेंबर

शंभरी ओलांडलेल्या दिवाळी अंकाच्या परंपरेने या वर्षीही मोठ्या प्रमाणात बाजारात आपला ठसा उमटवला आहे.

मराठी वाचक दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी अंकांची खरेदी करतात.

वर्षानुवर्षे ही परंपरा सुरु आहे. महागाईची झळ जरी दिवाळी अंकांना बसत असली तरी वाचकांच्या उत्साहात मात्र खंड पडलेला नाही.

यंदा दिवाळी अंकांच्या किंमती 80-90 आणि 100 रुपयांच्या घरात आहेत. यंदाही जवळपास चारशे ते साडे चारशे अंक बाजारात आले आहेत.

एकाच विषयाला वाहून घेतलेल्या अंकांचंही प्रमाण यंदा खूप आहे, असं मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी बोलताना सांगितलं.

शिवाय अंकासोबत पुस्तक आणि डायरीची स्किमसुद्धा पहायला मिळतेय. बाजारात अधिष्ठान, हंस, चपराक हे साहित्यावरचे अंक आहेत.

मौज, शब्द, अक्षर, दिपावली, साप्ताहिक सकाळ, मिळून सार्‍याजणी, ऋतुरंग, चारचौघी, स्पंदन, माहेर, मैत्रिण या अंकाना जास्त मागणी आहे.

यंदा अंकांची मांडणीसोबत महत्वाचा फरक पडलाय तो कव्हरपेजमध्ये. नटींच्या फोटोपेक्षा रेखाचित्रांचा वापर जास्त दिसून येतोय.

आयडिअल बुक हाऊसचे मंदार नेरुरकर यांनी बदललेल्या ट्रेंडविषयी बोलताना सांगितलं की यंदा वास्तू या विषयावर 5 अंक आहेत. इतकंच नाही तर वधूवर सूचक अंकही आलेयत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 09:09 AM IST

ताज्या बातम्या