कल्याण-डोंबिवलीत धुमधडाका

कल्याण-डोंबिवलीत धुमधडाका

24 ऑक्टोबरआजचा रविवार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचारासाठीचा शेवटचा रविवार असल्याने सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज संध्याकाळी कल्याणमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सभा होणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री नारायण राणे या सभेला उपस्थित राहणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नी शर्मिलाही सहभागी होतील. प्रचारात शिवसेनाही मागे नसून उद्धव ठाकरेही संध्याकाळी रोड शो घेत आहे. संध्याकाळी डोंबिवलीमध्ये हा शो संपणार आहे. या रोड शो मध्ये राहूल गांधींच्या वक्तव्याविरोधात सह्यांची मोहीमही सुरु करणार आहेत.जाऊ बाई जोरातकल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकांमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रिंगणात उतरल्यात आहे. डोंबिवली मधील विविध प्रभागांतील महिलांच्या भेटीगाठी केल्या. तर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेने प्रचाराला सुरूवात केली आहे. राज ठाकरे प्रत्यक्ष प्रचारात उतरले नसले तरी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेचा प्रचार सुरू केला.कल्याण पूर्व परिसरात मनसेच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांचा रोड शो करण्यात आला. सभेतले भाषण करण्याची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाकली तर मी फक्त रोड शो करणार असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय कल्याण-डोंबिवली परिसरात 10 रोड शो करणार असल्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी राजकीय क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या आदित्य ठाकरेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांमध्ये सत्त्ताधा-यांविषयी रोष आहे आणि तो आम्हाला दिसतोय असंही त्या म्हणाल्या.बाळासाहेबांची आणि राज ठाकरे एकाच ठिकाणी सभाकल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकांमुळे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे समोरासमोर येणार आहे. बाळासाहेब ठाकरेंची 28 तारखेला डोंबिलीत जिथे सभा होणार आहे असे सांगितले जात आहे, तिथेच राज ठाकरे यांचीही सभा होणार आहे. गावांचा विकास करा अन्यथा मनपातून गावं वगळाकल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून तीन गावे वगळण्यात यावी अशी मागणी गेली आठ वर्षे केली जात आहे. टिटवाळ्याजवळील आंबिवली, मोहिनी आणि कल्याणी या तीन्ही गावांचा मागील पंधरा वर्षांत विकास न झाल्याने गावक-यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सहा निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. याही महापालिका निवडणुकांमध्ये पूर्णपणे बहिष्कार असल्याचं गावकरी सांगत आहे. एक तर गावांचा विकास करा अन्यथा महापालिकेतून ही गावं वगळावीत अशी भूमिका ठामपणे ग्रामस्थांनी मांडली. महागाईला जबाबदार आघाडीला थारा देऊ नका-स्मृती इराणी महागाईला जबाबदार असणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोल्हापूर महापालिकेला निवडणुकीत थारा देऊ नका, असे आवाहन भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. अपक्षांची मोट बांधून छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणीचे नाव खराब करणार्‍यांनाही या निवडणुकीत उलथवून लावा, असंही इराणी यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी भाजपने आपला जाहीरनामाही जाहीर केला. आज भाजपच्यावतीने महिलांसाठी खास जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी स्मृती इराणी बोलत होत्या.

  • Share this:

24 ऑक्टोबर

आजचा रविवार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचारासाठीचा शेवटचा रविवार असल्याने सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

आज संध्याकाळी कल्याणमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सभा होणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री नारायण राणे या सभेला उपस्थित राहणार आहेत.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नी शर्मिलाही सहभागी होतील.

प्रचारात शिवसेनाही मागे नसून उद्धव ठाकरेही संध्याकाळी रोड शो घेत आहे. संध्याकाळी डोंबिवलीमध्ये हा शो संपणार आहे.

या रोड शो मध्ये राहूल गांधींच्या वक्तव्याविरोधात सह्यांची मोहीमही सुरु करणार आहेत.

जाऊ बाई जोरात

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकांमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रिंगणात उतरल्यात आहे.

डोंबिवली मधील विविध प्रभागांतील महिलांच्या भेटीगाठी केल्या. तर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेने प्रचाराला सुरूवात केली आहे.

राज ठाकरे प्रत्यक्ष प्रचारात उतरले नसले तरी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेचा प्रचार सुरू केला.कल्याण पूर्व परिसरात मनसेच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांचा रोड शो करण्यात आला.

सभेतले भाषण करण्याची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाकली तर मी फक्त रोड शो करणार असे त्यांनी सांगितले आहे.

शिवाय कल्याण-डोंबिवली परिसरात 10 रोड शो करणार असल्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी राजकीय क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या आदित्य ठाकरेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकांमध्ये सत्त्ताधा-यांविषयी रोष आहे आणि तो आम्हाला दिसतोय असंही त्या म्हणाल्या.

बाळासाहेबांची आणि राज ठाकरे एकाच ठिकाणी सभा

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकांमुळे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे समोरासमोर येणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंची 28 तारखेला डोंबिलीत जिथे सभा होणार आहे असे सांगितले जात आहे, तिथेच राज ठाकरे यांचीही सभा होणार आहे.

गावांचा विकास करा अन्यथा मनपातून गावं वगळा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून तीन गावे वगळण्यात यावी अशी मागणी गेली आठ वर्षे केली जात आहे.

टिटवाळ्याजवळील आंबिवली, मोहिनी आणि कल्याणी या तीन्ही गावांचा मागील पंधरा वर्षांत विकास न झाल्याने गावक-यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत सहा निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. याही महापालिका निवडणुकांमध्ये पूर्णपणे बहिष्कार असल्याचं गावकरी सांगत आहे.

एक तर गावांचा विकास करा अन्यथा महापालिकेतून ही गावं वगळावीत अशी भूमिका ठामपणे ग्रामस्थांनी मांडली.

महागाईला जबाबदार आघाडीला थारा देऊ नका-स्मृती इराणी

महागाईला जबाबदार असणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोल्हापूर महापालिकेला निवडणुकीत थारा देऊ नका, असे आवाहन भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

अपक्षांची मोट बांधून छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणीचे नाव खराब करणार्‍यांनाही या निवडणुकीत उलथवून लावा, असंही इराणी यांनी सांगितलं आहे.

तसेच यावेळी भाजपने आपला जाहीरनामाही जाहीर केला. आज भाजपच्यावतीने महिलांसाठी खास जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी स्मृती इराणी बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 10:46 AM IST

ताज्या बातम्या