रोहिंटन मिस्त्रींच्या पुस्तकाला डबेवाल्यांचा विरोध

रोहिंटन मिस्त्रींच्या पुस्तकाला डबेवाल्यांचा विरोध

विनोद तळेकर, मुंबई19 ऑक्टोबररोहिंटन मिस्त्री यांच्या ' सच अ लाँग जर्नी' या पुस्तकावरचा वाद संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आता या पुस्तकात आपल्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे सांगत मुंबईच्या डबेवाल्यांनीच या पुस्तकाला हरकत घेतली आहे.लाखो मुंबईकरांना वेळच्या वेळी त्यांच्या घरचे गरमागरम जेवण पोहचवणारे मुंबईचे डबेवाले हे मुंबईचा एक अविभाज्य भाग समजले जातात. त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे मॅनेजमेंट गुरू म्हणून संबोधले जाणारे हे डबेवाले सातासमुद्रापार पोहोचलेत. गेले अनेक दिवस वादाच्या भोवर्‍यात राहिलेल्या रोहींटन मिस्त्रींच्या सच अ लाँग जर्नी या पुस्तकात आपला आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे सांगत मुंबईच्या या डबेवाल्यांनी या पुस्तकावरच बंदी घालण्याची मागणी केली आहे. या अगोदर शिवसेनेने या पुस्तकातला मजकूर हा आक्षेपार्ह असून त्याची भाषा शिवराळ आहे असे म्हणत या पुस्तकाची होळी केली होती. आणि विद्यापीठाने हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून वगळले होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेशच मुळी या पुस्तकाच्या विरोधातील आंदोलनाने झाला. पहिलेच आंदोलन यशस्वी केल्याबद्दल दसरा मेळाव्यात शिवसेनप्रमुखांनीही आदित्यची पाठ थोपटली. पण शिवसेनेला जरी हे यश वाटत असले, तरी या मुद्द्याचे राजकरण करून एक चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती बुद्धीजीवी वर्गात व्यक्त होत आहे.पुस्तकांवरून वाद महाराष्ट्राला काही नवे नाहीत. पण त्यावरच्या वादाची सत्यासत्यता पडताळून न पाहता एखाद्या मुद्द्याचे राजकारण केले जाणे, हे चूक आहे. म्हणूनच 1991 साला प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर आता 20 वर्षानंतर वाद होणे, यामागे काही राजकीय गणिते आहेत का ? अशी शंका येणे स्वाभाविक आहे.

  • Share this:

विनोद तळेकर, मुंबई

19 ऑक्टोबर

रोहिंटन मिस्त्री यांच्या ' सच अ लाँग जर्नी' या पुस्तकावरचा वाद संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

आता या पुस्तकात आपल्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे सांगत मुंबईच्या डबेवाल्यांनीच या पुस्तकाला हरकत घेतली आहे.

लाखो मुंबईकरांना वेळच्या वेळी त्यांच्या घरचे गरमागरम जेवण पोहचवणारे मुंबईचे डबेवाले हे मुंबईचा एक अविभाज्य भाग समजले जातात.

त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे मॅनेजमेंट गुरू म्हणून संबोधले जाणारे हे डबेवाले सातासमुद्रापार पोहोचलेत.

गेले अनेक दिवस वादाच्या भोवर्‍यात राहिलेल्या रोहींटन मिस्त्रींच्या सच अ लाँग जर्नी या पुस्तकात आपला आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे सांगत मुंबईच्या या डबेवाल्यांनी या पुस्तकावरच बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या अगोदर शिवसेनेने या पुस्तकातला मजकूर हा आक्षेपार्ह असून त्याची भाषा शिवराळ आहे असे म्हणत या पुस्तकाची होळी केली होती.

आणि विद्यापीठाने हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून वगळले होते.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेशच मुळी या पुस्तकाच्या विरोधातील आंदोलनाने झाला.

पहिलेच आंदोलन यशस्वी केल्याबद्दल दसरा मेळाव्यात शिवसेनप्रमुखांनीही आदित्यची पाठ थोपटली. पण शिवसेनेला जरी हे यश वाटत असले, तरी या मुद्द्याचे राजकरण करून एक चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती बुद्धीजीवी वर्गात व्यक्त होत आहे.

पुस्तकांवरून वाद महाराष्ट्राला काही नवे नाहीत. पण त्यावरच्या वादाची सत्यासत्यता पडताळून न पाहता एखाद्या मुद्द्याचे राजकारण केले जाणे, हे चूक आहे.

म्हणूनच 1991 साला प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर आता 20 वर्षानंतर वाद होणे, यामागे काही राजकीय गणिते आहेत का ? अशी शंका येणे स्वाभाविक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...