Elec-widget

वाघोबा घ्या, दत्तक!

वाघोबा घ्या, दत्तक!

19 ऑक्टोबर प्राची कुलकर्णी, पुणे प्राणी दत्तक घ्यायचा म्हटले की आपण कुत्रा किंवा मांजर यांचा विचार करायला लागतो... पण आता चक्क वाघ आणि सिंहही दत्तक घेता येणार आहेत... पुण्यातील कात्रज सर्पोद्यानात सुरु झालेल्या या योजनेचा शुभारंभ राजीव पटेल यांनी एक बिबट्या दत्तक घेउन केला आहे.सध्या कात्रज सर्पोद्यानात एकूण 345 प्राणी आहेत. या योजनेत हे प्राणी किंवा त्यांचे अख्खे कुटुंबही दत्तक घेता येणार आहेत. या पैशांमधून या प्राण्यांच्या देखभालीचा खर्च उचलला जाणार आहे. अर्थात हे प्राणी तुम्हांला घरी मात्र नेता येणार नाहीत. ते राहणार आहेत, कात्रज सर्पोद्यानातच. यासाठी दर पुढीलप्रमाणे... वाघ - 15, 000 रुपयेबिबट्या - 5,000 रु.हत्ती - 45, 000 रु. अस्वल- 5, 000 रु.रानगवा - 15, 000 रु.लांडगा - 4, 000 रु.चितळ - 15 ,000 रु.सांबर - 25, 000 रु. प्राणी आणि माणसांमध्ये आपलेपणा निर्माण होण्यासाठी ही प्राणी दत्तक योजना वरदानच ठरणार आहे.

  • Share this:

19 ऑक्टोबर

प्राची कुलकर्णी, पुणे

प्राणी दत्तक घ्यायचा म्हटले की आपण कुत्रा किंवा मांजर यांचा विचार करायला लागतो... पण आता चक्क वाघ आणि सिंहही दत्तक घेता येणार आहेत... पुण्यातील कात्रज सर्पोद्यानात सुरु झालेल्या या योजनेचा शुभारंभ राजीव पटेल यांनी एक बिबट्या दत्तक घेउन केला आहे.

सध्या कात्रज सर्पोद्यानात एकूण 345 प्राणी आहेत. या योजनेत हे प्राणी किंवा त्यांचे अख्खे कुटुंबही दत्तक घेता येणार आहेत.

या पैशांमधून या प्राण्यांच्या देखभालीचा खर्च उचलला जाणार आहे. अर्थात हे प्राणी तुम्हांला घरी मात्र नेता येणार नाहीत.

ते राहणार आहेत, कात्रज सर्पोद्यानातच.

यासाठी दर पुढीलप्रमाणे...

वाघ - 15, 000 रुपये

बिबट्या - 5,000 रु.

हत्ती - 45, 000 रु.

अस्वल- 5, 000 रु.

रानगवा - 15, 000 रु.

लांडगा - 4, 000 रु.

चितळ - 15 ,000 रु.

सांबर - 25, 000 रु.

प्राणी आणि माणसांमध्ये आपलेपणा निर्माण होण्यासाठी ही प्राणी दत्तक योजना वरदानच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2010 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com