शरद पवारांनी दिले पुन्हा मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत

शरद पवारांनी दिले पुन्हा मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत

  • Share this:

Image Maypawaronipl_240x180.jpg13 ऑक्टोबर : देशात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केलंय. आंध्रच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या खासदारांचं राजीनामासत्र सुरू राहील आणि त्यामुळे युपीए सरकार अल्पमतात येण्याची शक्यता असून मुदतपुर्व निवडणुका होऊ शकतात असं भाकीत पवारांनी व्यक्त केलं.

 

ही शक्यता व्यक्त करत पवारांनी आपल्या पक्षाला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहे. आज रोह्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनेक विषयांवर मत व्यक्त केलं.

 

जागावाटपाचा तिढा दोन्ही काँग्रेसनी एकत्र बसून सोडवला पाहिजे असंही पवार म्हणाले. राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेत तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी अण्णा हजारे, मेधा पाटकर ,गोपीनाथ मुंडे आणि मुख्यमंत्र्यांना टोला हाणण्याची संधीही त्यांनी सोडली नाही.

 

अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी साखर कारखान्याच्या मुद्यावरून केले आरोप पवारांनी फेटाळून लावले. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या निवृत्तीवरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च कामगिरी करत असताना वयोमानाचा विचार करून सचिनने योग्य निर्णय घेतलाय. जसा मी ही लोकसभा निवडणूक लढवायचा नाही असा निर्णय घेतला असं प्रतिक्रिया पवारांनी दिली.

First published: October 12, 2013, 2:25 PM IST

ताज्या बातम्या