उमेश आगळे हत्येप्रकरणाला वेगळं वळण, 'ऑनर किलिंग'चा संशय

उमेश आगळे हत्येप्रकरणाला वेगळं वळण, 'ऑनर किलिंग'चा संशय

  • Share this:

umesh_aagale06 मे : औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यामध्ये देवपुळ गावच्या मातंग तरुणाच्या खुनाला आता वेगळं वळण मिळालंय. गावतल्या उमेश आगळे या मातंग तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता.

गावातल्या कैलाश काजे या उच्चजातीय तरुणानं उमेशला धमकी दिल्याचा आरोप उमेशच्या कुटुंबीयांनी केलाय. आमच्या मुलीकडे का पाहतोस याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी कैलाश काजेने दिली होती आणि याच कैलास काजेनं उमेशला 25 एप्रिल रोजी रात्री घरातून नेलं होतं असं उमेशच्या कुटुंबीयांनी सांगितलंय.

त्यानंतर उमेश गावातल्या विहिरीत मृत अवस्थेत सापडला होता. उमेशच्या डोक्यावर मागच्या बाजूला मोठी खोच पडली होती. या प्रकरणी उच्च जातीय आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पण पिशोरचे पोलीस निरिक्षक प्रफुल्ल अंकुशवार यांनी जाणीवपूर्वक आरोपींना अटक केलेली नाही असा प्रश्न आगळे कुटुंबीयांनी उपस्थित केलाय. उमेशचा मृत्यू डोक्याला जखम झाल्यानं झाल्याचं शवविच्छेदन रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं. मात्र पोलीस रिपोर्ट मिळाला नसल्याचं सांगत आहेत. एकंदरीत आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवला असूनही का अटक होत नाही आणि पोलीस शवविच्छेदन रिपोर्ट का दडवून ठेवत आहेत असा संशय बळावला जात आहे.

First published: May 6, 2014, 8:58 PM IST

ताज्या बातम्या