स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी जळगावात मोहीम

स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी जळगावात मोहीम

8 ऑक्टोबरमुली जन्माला येण्याचे सगळ्यांत कमी प्रमाण असलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो. राज्यात सगळ्यात जास्त हुंडाबळींची संख्या या जिल्ह्यात आहे. पण आता जळगाव जिल्हा प्रशासनाने मुलींची गर्भातच होणारी हत्या रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सना प्रत्येक गर्भवती स्त्रीची संपूर्ण माहिती ऑनलाईन देणे बंधनकारक असणार आहे. फॉर्म 16 असे याचे नाव आहे. या माहितीमध्ये त्या स्त्रीचे वय, तिला आधी किती मुले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती असेल. तसेच जिल्ह्यातील सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सना MIOB नावाचे एक उपकरण बसवण्यात येणार आहे. हे उपकरण बसवणे सगळ्या सेंटर्सना बंधनकारक असेल. या उपकरणामध्ये केल्या जाणार्‍या प्रत्येक सोनोग्राफीची आणि टेस्टची नोंद होईल. या उपकरणाचा पासवर्ड, युझर नेम हा फक्त जिल्हाधिकार्‍याला आणि संबंधित इंजीनिअरला माहित असेल. या उपकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. डॉक्टर्स, IMAचे प्रतिनिधी, आणि महिला संघटनांच्या प्रतिनिधींचा यात समावेश होता.स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी हे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. आणि कायदा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करु, असा इशाराही दिला आहे.

  • Share this:

8 ऑक्टोबर

मुली जन्माला येण्याचे सगळ्यांत कमी प्रमाण असलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो. राज्यात सगळ्यात जास्त हुंडाबळींची संख्या या जिल्ह्यात आहे. पण आता जळगाव जिल्हा प्रशासनाने मुलींची गर्भातच होणारी हत्या रोखण्याचा निर्धार केला आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सना प्रत्येक गर्भवती स्त्रीची संपूर्ण माहिती ऑनलाईन देणे बंधनकारक असणार आहे. फॉर्म 16 असे याचे नाव आहे. या माहितीमध्ये त्या स्त्रीचे वय, तिला आधी किती मुले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती असेल.

तसेच जिल्ह्यातील सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सना MIOB नावाचे एक उपकरण बसवण्यात येणार आहे. हे उपकरण बसवणे सगळ्या सेंटर्सना बंधनकारक असेल. या उपकरणामध्ये केल्या जाणार्‍या प्रत्येक सोनोग्राफीची आणि टेस्टची नोंद होईल.

या उपकरणाचा पासवर्ड, युझर नेम हा फक्त जिल्हाधिकार्‍याला आणि संबंधित इंजीनिअरला माहित असेल. या उपकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. डॉक्टर्स, IMAचे प्रतिनिधी, आणि महिला संघटनांच्या प्रतिनिधींचा यात समावेश होता.

स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी हे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. आणि कायदा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करु, असा इशाराही दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading