ही गोष्ट आहे तहानलेल्या माकडांची !

ही गोष्ट आहे तहानलेल्या माकडांची !

यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथं पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या एका माकडाच्या पिल्लाचं डोकं एका तांब्यात अडकलं आहे. त्यामुळे या पिल्लाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडाची धडपड सुरु होती.

  • Share this:

20 मे : यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथं पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या एका माकडाच्या पिल्लाचं डोकं एका तांब्यात अडकलं आहे. त्यामुळे या पिल्लाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडाची धडपड सुरु होती. याची माहिती वन विभागाला मिळताच कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्या पिल्लाला जीवनदान दिले.

ही घटना शहरात माहित होताच माकडाच्या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्याचं झालं असं की दिग्रसमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई आहे. माकडांचा एक कळप पाणी शोधत शहरात आला. या माकडाच्या पिल्लाला पाण्याने भरलेला तांब्या दिसता. तांब्यावर झडप घालून पाणी पिल्यानंतर पिलाचं तोंड त्या तांब्यातून निघेना. ते पिल्लू सैरावैरा पळू लागलं.

त्यानंतर माकडीन त्या पिलाला घेऊन झाडावर गेली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एअर गनच्या साहाय्याने माकडीनीला बेशुद्ध केलं. आणि त्या पिलाच्या डोक्यातून तांब्या काढला आणि त्या पिल्लाचा जीव वाचला.

First published: May 20, 2018, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading