विवेक पंडितांचा सरकारवर आरोप

1 ऑक्टोबरवसई विरार महापालिका क्षेत्रातली गावे वगळण्याच्या संदर्भात राज्यसरकार राजकारण करत असल्याचा आरोप वसई जन आंदोलन समितीचे अध्यक्ष आमदार विवेक पंडीत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी विधान सभेत आश्वासन दिल्याप्रमाणे वसई विरार महापालिका क्षेत्रातून 14 गावे वगळण्यात आल्याची लेखी माहिती विवेक पंडीत यांना ठाणे जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली. या संदर्भात विवेक पंडीत यांनी ग्रामीण विकास विभागाकडे चौकशी केली असता अशी कोणतीही अधीसूचना निघालीच नसल्याचे त्यांनी लेखी स्वरुपात स्पष्ट केले. या दोन्हींचे लेखी पुरावे आपल्याजवळ आहेत, असे सांगत या प्रकरणी राजकारण केले जात असून बोगस कागदपत्रे बनवली गेली आहेत, असा आरोप विवेक पंडीत यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी वसई जनआंदोलन समितीतर्फे वसई ते मुख्यमंत्री निवास असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2010 11:42 AM IST

विवेक पंडितांचा सरकारवर आरोप

1 ऑक्टोबर

वसई विरार महापालिका क्षेत्रातली गावे वगळण्याच्या संदर्भात राज्यसरकार राजकारण करत असल्याचा आरोप वसई जन आंदोलन समितीचे अध्यक्ष आमदार विवेक पंडीत यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी विधान सभेत आश्वासन दिल्याप्रमाणे वसई विरार महापालिका क्षेत्रातून 14 गावे वगळण्यात आल्याची लेखी माहिती विवेक पंडीत यांना ठाणे जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली.

या संदर्भात विवेक पंडीत यांनी ग्रामीण विकास विभागाकडे चौकशी केली असता अशी कोणतीही अधीसूचना निघालीच नसल्याचे त्यांनी लेखी स्वरुपात स्पष्ट केले.

या दोन्हींचे लेखी पुरावे आपल्याजवळ आहेत, असे सांगत या प्रकरणी राजकारण केले जात असून बोगस कागदपत्रे बनवली गेली आहेत, असा आरोप विवेक पंडीत यांनी केला आहे.

याच्या निषेधार्थ शनिवारी वसई जनआंदोलन समितीतर्फे वसई ते मुख्यमंत्री निवास असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...