टी-20 वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला मिळाली संधी

टी-20 वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला मिळाली संधी

भारतीय संघ 2020मध्ये तब्बल तीन वर्ल्ड कप खेळणार आहे. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतीय संघ 2020मध्ये तब्बल तीन वर्ल्ड कप खेळणार आहे. यात एक अंडर-19 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. विश्वचषक व्यतिरिक्त महिला आणि पुरुष टी -20 वर्ल्ड कपदेखील होणार आहेत. पुरुष टी-20 वर्ल्ड कपसाठी बराच काळ शिल्लक असला तरी परंतु त्याआधी, 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

या स्पर्धेसाठी आज बीसीसीआच्या वतीनं टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. तर, स्मृती मांधनाला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी युवा फलंदाज शेफाली वर्मावरही निवड समितीने दाखवला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा पहिलाच सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs Team India) यांच्यात सिडनी येथे होणार आहे.

शेफालीला वर्ल्ड कप संघात मिळाली संधी

आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये पाऊल टाकताच 15 वर्षांच्या शेफालीने सर्वांना चकित केले आणि त्या जोरावर तिला टी -20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान देण्यात आले. शेफालीने 9 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांमध्ये 142.30 च्या स्ट्राइक रेटने 222 धावा केल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ- स्मृति मांधना (उप कर्णधार), हरमनप्रीत कौर (कप्तान), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरूणधती रॉय

Published by: Priyanka Gawde
First published: January 12, 2020, 12:55 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading