शांततेसाठीचा नोबेल OPCW ला जाहीर

शांततेसाठीचा नोबेल OPCW ला जाहीर

  • Share this:

opcw11 ऑक्टोबर : यंदाचा प्रतिष्ठेचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स म्हणजेच ओपीसीडब्ल्यू (OPCW) ला यंदाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारनं गौरवण्यात आलंय.

 

OPCW ही केमिकल वेपन्स परिषदेची अंमलबजावणीची संस्था आहे. देशभरात रासायनिक शस्त्र नष्ट करणे, त्यांचावर देखरेख ठेवण्याचं काम OPCW करते. सध्या ही संस्था   संस्था सीरियातल्या रासायनिक शस्त्र नष्ट करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवतेय.

 

शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत पाकिस्तानात महिलांच्या शिक्षणासाठी तालिबान्यांच्याविरोधात लढा देणारी 16 वर्षांची मलाला युसुफजई होती. यंदाचा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मलाला प्रमुख दावेदार मानलं जातं होतं. आज नार्वेची राजधानी ऑस्लोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता पुरस्काराची घोषणा झाली. हा पुरस्कार OPCW ला देण्यात आला. या पुरस्काराचं स्वरुप सुवर्ण पदक आणि 12 लाख डॉलर म्हणजे 75 लाख इतकं आहे.

ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स

- मुख्यालय - हेग, नेदरलँड

- स्थापना - 1997

- सदस्य - 190 देश

- सीरियातल्या रासायनिक शस्त्रास्त्रांची केली तपासणी

First published: October 11, 2013, 2:18 PM IST

ताज्या बातम्या