पुणे फेस्टिव्हल 17 सप्टेंबरपासून

पुणे फेस्टिव्हल 17 सप्टेंबरपासून

10 सप्टेंबर पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 17 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 17 सप्टेंबरला सायंकाळी 4.30 वाजता केंद्रीय पर्यटनमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यगृहात फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गृहराज्यमंत्री रमेश बागवे डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री नारायण राणे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये हेमा मालिनी यांचा एक नवा बॅले सादर होणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या मुली इशा आणि आहाना याही सहभागी होतील. यासोबतच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, उद्योगपती सायरस पुनावाला आणि अनु आगा यांना पुणे फेस्टीव्हलमध्ये सन्मानित केले जाणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी ही माहिती दिली.

  • Share this:

10 सप्टेंबर

पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 17 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 17 सप्टेंबरला सायंकाळी 4.30 वाजता केंद्रीय पर्यटनमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यगृहात फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी गृहराज्यमंत्री रमेश बागवे डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री नारायण राणे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये हेमा मालिनी यांचा एक नवा बॅले सादर होणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या मुली इशा आणि आहाना याही सहभागी होतील.

यासोबतच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, उद्योगपती सायरस पुनावाला आणि अनु आगा यांना पुणे फेस्टीव्हलमध्ये सन्मानित केले जाणार आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी ही माहिती दिली.

First published: September 10, 2010, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading