परभणी, 18 मार्च : परभणी जिल्हा आजही विकासापासून कोसो दूर आहे. इथं निवडणुकीच्या काळात विकासाचे नव्हे तर धार्मिक मुद्देच ऐरणीवर येतात. लोकसभा निवडणुकांसाठी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात ताकद आहे. वंचित बहुजन आघाडीही मैदानात उतरल्यानं लढत रंगतदार होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर निवडणुकीचं चित्र अवलंबून असणार आहे.