गिरणी कामगारांचे उपोषण मागे

गिरणी कामगारांचे उपोषण मागे

10 एप्रिलहक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांनी पुकारलेलं आजचं उपोषण मागे घेतलं आहे. गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहिर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे पण आमचा लढा सुरू राहणार आहे असंही कामगार संघटनेनं स्पष्ट केलं. कामगारांच्या घरांच्या किंमती संदर्भात आणि घरांसाठी जमीन उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठीच्या समित्या 7 दिवसात स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण त्याबाबत सरकारी स्तरावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे गिरणी कामगारांनी आज आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

  • Share this:

10 एप्रिल

हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांनी पुकारलेलं आजचं उपोषण मागे घेतलं आहे. गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहिर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे पण आमचा लढा सुरू राहणार आहे असंही कामगार संघटनेनं स्पष्ट केलं. कामगारांच्या घरांच्या किंमती संदर्भात आणि घरांसाठी जमीन उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठीच्या समित्या 7 दिवसात स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण त्याबाबत सरकारी स्तरावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे गिरणी कामगारांनी आज आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

First published: April 10, 2012, 11:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या