भारत आणि न्युझीलंड आमने सामने

25 ऑगस्टश्रीलंका ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीमची शेवटची लीग मॅच आज न्यूझीलंडबरोबर होणार आहे. मॅच जवळ जवळ सेमी फायनलसारखी आहे. कारण मॅचमध्ये जिंकणारी टीम फायनलमध्ये जाईल. भारतीय टीमसाठी मात्र बॅटिंग हा चिंतेचा विषय असणार आहे. कारण मागच्या एका आठवड्यात दोन वेळा भारतीय टीम जवळपास शंभर रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे फायनलमध्ये जायचं असेल तर भारतीय बॅट्समनवर मोठी जबाबदारी असणार आहे. पॉइंट टेबलमध्ये भारतीय टीम सध्या तळाला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये पाऊस पडू नये अशी प्रार्थना भारतीय टीम करत असणार आहे. कारण न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टीमला निर्णायक विजय हवा आहे. आणि भारतीय टीमला मोठा स्कोअर हवा असेल तर पहिल्या तीन बॅट्समनच्या खांद्यावर त्याची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंड टीमला मागील मॅचमध्ये लंकेविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्याने चांगलाच फटका बसला आहे.दोन्ही टीमना समान पॉइंट मिळाल्यामुळे आता भारताविरुद्धची मॅच त्यांना जिंकावीच लागणार आहे. पण स्पर्धेच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी भारतीय टीमला दोनशे पेक्षा जास्त रन्सनी हरवलं होतं. त्यामुळे या मॅचमध्येही त्यांचंच पारडं जड असणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2010 11:07 AM IST

भारत आणि न्युझीलंड आमने सामने

25 ऑगस्ट

श्रीलंका ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीमची शेवटची लीग मॅच आज न्यूझीलंडबरोबर होणार आहे. मॅच जवळ जवळ सेमी फायनलसारखी आहे. कारण मॅचमध्ये जिंकणारी टीम फायनलमध्ये जाईल. भारतीय टीमसाठी मात्र बॅटिंग हा चिंतेचा विषय असणार आहे. कारण मागच्या एका आठवड्यात दोन वेळा भारतीय टीम जवळपास शंभर रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे फायनलमध्ये जायचं असेल तर भारतीय बॅट्समनवर मोठी जबाबदारी असणार आहे. पॉइंट टेबलमध्ये भारतीय टीम सध्या तळाला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये पाऊस पडू नये अशी प्रार्थना भारतीय टीम करत असणार आहे. कारण न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टीमला निर्णायक विजय हवा आहे. आणि भारतीय टीमला मोठा स्कोअर हवा असेल तर पहिल्या तीन बॅट्समनच्या खांद्यावर त्याची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंड टीमला मागील मॅचमध्ये लंकेविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्याने चांगलाच फटका बसला आहे.

दोन्ही टीमना समान पॉइंट मिळाल्यामुळे आता भारताविरुद्धची मॅच त्यांना जिंकावीच लागणार आहे. पण स्पर्धेच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी भारतीय टीमला दोनशे पेक्षा जास्त रन्सनी हरवलं होतं. त्यामुळे या मॅचमध्येही त्यांचंच पारडं जड असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2010 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...