गोल्फर अर्जुन अटवालनं रचला इतिहास

23 ऑगस्ट भारताचा गोल्फर अर्जुन अटवालने इतिहास रचला आहे. अमेरिकेत पार पडलेल्या विंडहॅम गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये त्याने विजेतेपद पटकावलं आहे. गोल्फ पीजीए टुर जिंकणारा अटवाल हा पहिलाच भारतीय ठरला आहे.स्पर्धेच्या फायनल फेरीत त्याच्याकडे 3 स्ट्रोक्सची आघाडी होती. पण सात फुटावरुन मारलेल्या पहिल्याच फटक्यात बॉल फायनल होलमध्ये टोलवण्यात त्याने यश मिळवले. अशी कामगिरी करताना त्याने सर्वात कमी गुणसंख्या नोंदवली. त्याचा प्रतिस्पर्धी डेव्हीड टॉम्सला मात्र फायनल होलसाठी तिला स्ट्रोक्सचा आधार घ्यावा लागला. अर्जुन अटवालनं ही स्पर्धा जिंकत 918 हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. त्याचबरोबर तो आता पीजीए टुरमध्ये यापुढच्या दोन वर्षांसाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरला आहे. तसंच मास्टर्स टुर्नामेंटमध्येही तो सहभागी होऊ शकणार आहे. अटवालने आपल्या करियरमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2010 11:37 AM IST

गोल्फर अर्जुन अटवालनं रचला इतिहास

23 ऑगस्ट

भारताचा गोल्फर अर्जुन अटवालने इतिहास रचला आहे. अमेरिकेत पार पडलेल्या विंडहॅम गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये त्याने विजेतेपद पटकावलं आहे. गोल्फ पीजीए टुर जिंकणारा अटवाल हा पहिलाच भारतीय ठरला आहे.

स्पर्धेच्या फायनल फेरीत त्याच्याकडे 3 स्ट्रोक्सची आघाडी होती. पण सात फुटावरुन मारलेल्या पहिल्याच फटक्यात बॉल फायनल होलमध्ये टोलवण्यात त्याने यश मिळवले. अशी कामगिरी करताना त्याने सर्वात कमी गुणसंख्या नोंदवली. त्याचा प्रतिस्पर्धी डेव्हीड टॉम्सला मात्र फायनल होलसाठी तिला स्ट्रोक्सचा आधार घ्यावा लागला. अर्जुन अटवालनं ही स्पर्धा जिंकत 918 हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. त्याचबरोबर तो आता पीजीए टुरमध्ये यापुढच्या दोन वर्षांसाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरला आहे. तसंच मास्टर्स टुर्नामेंटमध्येही तो सहभागी होऊ शकणार आहे. अटवालने आपल्या करियरमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2010 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...