पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रासह भारतही गोठणार, हवामान खात्याचा इशारा

पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रासह भारतही गोठणार, हवामान खात्याचा इशारा

गेल्या 3-4 दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढला असून मुंबईदेखील गारेगार झाली आहे. आणखी काही दिवस मुंबईकरांना ही थंडी अनुभवता येणारा आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : गेल्या 3-4 दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढला असून मुंबईदेखील गारेगार झाली आहे. आणखी काही दिवस मुंबईकरांना ही थंडी अनुभवता येणारा आहे. मुंबई आजचं तापमान 15.8 अंश आहे. तर तिकडे उत्तर महाराष्टातही थंडीची लाट आली आहे.

आज निफाडचं किमान तापमान 4 अंश तर नाशिकचं तापमान सात डिग्री नोंदवण्यात आलं. निफाडचे तापमान काल 1.8 सेल्सियस होतं. त्यात सुधारणा होऊन आज तापमान 4 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं. इथं थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसत असून उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांचे मोठे होत आहेत.

पुढचे 5 दिवस भारतासह महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नीचांकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला निफाडनं थंडीच्या बाबतीच मागे टाकलं. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पारा घसरला आहे. धुळ्यात तापमान 3.2 अंश सेल्सिअस, मनमाड 8 अंश सेल्सिअस, अकोला 8.5 अंश सेल्सिअस तर परभणीत आज 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामानासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे

- उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट झाल्याचे सांगण्यात येतं आहे

- नाशिकमध्ये आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून पुढील 3-4 दिवसात नाशिकसह अहमदनगर आणि जळगाव या ठिकाणीदेखील वातावरण थंड राहिल

- मुंबईतील बहुतांश भागात सुरू असलेले बांधकाम आणि रस्ता खोदकामांमुळे

मुंबईतील काही भागात गेल्या आठवड्यात प्रदूषणाने उचांक गाठला

- राजधानी दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहराला मोठा सागरी किनारा लाभल्यामुळे मुंबईत वारे मोठ्या प्रमाणात वाहत असतात. परिणामी मुंबई शहरातील प्रदुषण दिल्लीप्रमाणे जास्त वेळ टिकत नाही.

Special Report : पब्जी सोडा, साधे 4 शब्द फोनवर बोलता आले तरी खूप झालं!

 

First published: December 28, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading