पुन्हा ठाणे !, अपहरण करणाऱ्या धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी

पुन्हा ठाणे !, अपहरण करणाऱ्या धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी

शेअर रिक्षाच्या नावाखाली तरूणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं. मात्र त्या तरूणीनं चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं ती वाचलीये.

  • Share this:

19 आॅगस्ट : ठाण्यात रिक्षाचालकांची पुन्हा मुजोरी पाहायला मिळालीये. शेअर रिक्षाच्या नावाखाली तरूणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं. मात्र त्या तरूणीनं चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं ती वाचलीये. रिक्षातल्या सीटसमोर त्या रिक्षाचालकाचे डिटेल्स चिकटवले होते. त्याचा तरूणीनं फोटो काढलाय मात्र मुजोर रिक्षा चालक अजून फरार आहे.

ठाण्यातील शुक्रवारी संध्याकाळी घोडबंदर रोड वर पुन्हा एकदा अमराठी रिक्षाचालकाने मुजोरी केल्याचा प्रकार घडला आहे. विहंग हॉटेलजवळ असलेल्या बस स्टाॅपवर रिक्षाची वाट पाहत असताना भांडूप येथे राहणाऱ्या युवतीने रिक्षाचालकाला विचारले ठाणे स्थानकाला जाणार का त्या वेळी त्यांनी जाणार असं सांगितलं. ही शेअर ऑटो आहे का असं विचारून होय असं उत्तर मिळाल्यावर ती रिक्षात बसली पण इतर कोणत्याही प्रवाश्याला न घेता रिक्षाचालक निघाला तेव्हा काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने तिने रिक्षाचालकाला हटकले, यानंतर रिक्षाचालकाने युवतीला शिवीगाळ करत रिक्षा पळवली. युवतीने रिक्षात आरडाओरड केल्यानंतर तिला मदतीला काही लोक पुढे आले. पण रिक्षाचालकाने रिक्षाचा वेग वाढवला पुढे संधी पाहून तिने स्वतःला वाचवण्यासाठी तोल सावरत रिक्षातून उडी मारली या प्रकारात ती जखमी झाली नाही.

या प्रकारानंतर पीडित युवतीने कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत घर गाठले. कुटुंबियांना झालेला प्रकार सांगितल्यावर कुटुंबियांनी आराम करून पोलीस तक्रार देण्यास सांगितलं. त्यानंतर आज आपल्या कार्यालयात जावून कार्यालयात देखील झालेला प्रकार सांगून सोबत मदतीला मित्रांना घेऊन कापुरबावडी पोलीस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार नोंदवली आहे.

हा धक्कादायक प्रकार सुरू असताना युवतीने हुशारी दाखवत रिक्षातील चालकाच्या सीट मागे रिक्षाची माहिती असलेल्या फलकाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढाल आहे.त्यामुळे पोलिसांना देखील आरोपीला पकडण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार नाहीये. आता या सर्व प्रकारच्या २० तासानंतर कापुरबावडी पोलिसांना जाग आली आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

First published: August 19, 2017, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading