टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

लवकरच दिशा पाटनी टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' मध्ये दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ हे बी टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत राहणारं कपल आहे. लवकरच दिशा पाटनी टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' मध्ये सुद्धा दिसणार आहे. फिटनेस फ्रिक या हॉट कपलला नेहमीच एकत्र स्पॉट केलं जातं. अदायप या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरी ज्या प्रकारे सर्व ठिकाणी हे दोघंही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. त्यावरुन त्यांच्या या नात्याची चर्चा सगळीकडे होतच असते. सध्या दिशा टायगरला डेट करते अशी चर्चा जरी असली तरीही टायगरच्या अगोदर ती एका अभिनेत्याला डेट करत होती. ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे.

टायगर श्रॉफच्या अगोदर दिशा टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथानला डेट करत होती. सध्या पार्थ ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये लीड रोलमध्ये दिसत आहे. या मालिकेत त्यांच्यासोबत एरिका फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.

सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू?

 

View this post on Instagram

 

❄️❄️⛄️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा आणि पार्थ एकमेकांना जवळपास 1 वर्ष डेट करत होते. ज्यावेळी हे दोघं एकमेकांना डेट करत होते त्यावेळी दिशा टीव्ही अभिनेत्री किंवा बॉलिवूडचा भाग नव्हती. तर पार्थ मात्र त्यावेळी 'कैसी ये यारिया' या शोमध्ये काम करत होता आणि तो दिशापेक्षा जास्त लोकप्रिय सुद्धा होता.

'आम्ही हरलो...', कुशल पंजाबीच्या निधनानंतर एकता कपूर भावुक

दिशा आणि पार्थमध्ये नेमके काय वाद होते हे माहित नाही मात्र पार्थ आणि टीव्ही निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक विकास गुप्ता यांच्यातील मैत्रीला दिशाचा आक्षेप होता असं म्हटलं जातं. त्याचवेळी या दोघांचे काही असे फोटो लिक झाले होते ज्यामुळे दिशा खूप दुःखी होती आणि यामुळेच तिनं पार्थसोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पार्थनं सुद्धा त्याचं आणि दिशाचं ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं होतं.

हिना खानचा बोल्ड अवतार, सोशल मीडियावर शेअर केले HOT फोटो

Published by: Megha Jethe
First published: December 31, 2019, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading