काश्मीरमधील 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

काश्मीरमधील 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

5 ऑगस्टकाश्मीरमधील पुलवामात आज सुरक्षारक्षकांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले. काही दिवसांपूर्वी निदर्शनाच्या वेळी जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा आज मृत्यू झाला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. काश्मीर खोर्‍यातील 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू प्रभावीपणे लागू करण्यात आला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली. दरम्यान, जोपर्यंत भारतीय लष्कर काश्मीरमध्ये आहे, तोपर्यंत खोर्‍यात शांतता नांदणे शक्य नाही, असे हुरियतचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी म्हटले आहे. तर काश्मीरमधील निदर्शने बंदुकीने चिरडण्याऐवजी केंद्राने समझोत्याची भूमिका घ्यायला हवी, असे पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

  • Share this:

5 ऑगस्ट

काश्मीरमधील पुलवामात आज सुरक्षारक्षकांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले.

काही दिवसांपूर्वी निदर्शनाच्या वेळी जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा आज मृत्यू झाला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

काश्मीर खोर्‍यातील 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू प्रभावीपणे लागू करण्यात आला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.

दरम्यान, जोपर्यंत भारतीय लष्कर काश्मीरमध्ये आहे, तोपर्यंत खोर्‍यात शांतता नांदणे शक्य नाही, असे हुरियतचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी म्हटले आहे.

तर काश्मीरमधील निदर्शने बंदुकीने चिरडण्याऐवजी केंद्राने समझोत्याची भूमिका घ्यायला हवी, असे पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2010 03:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading