पोलीस स्टेशनमध्ये डांबले शाळकरी मुलांना

पोलीस स्टेशनमध्ये डांबले शाळकरी मुलांना

4 ऑगस्टमिरज पोलीस ठाण्यात पोलिसांनी निष्पाप मुलांनाच डांबल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी आज विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एक रिक्षा पकडली. कारवाईसाठी ही रिक्षा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यापूर्वी त्यातील शाळकरी मुलांना सोडून देणे गरजेचे होते. पण पोलिसांनी त्यांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्येच डांबून ठेवले. मुलांच्या पालकांना संपर्क साधण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. दिवसभर उपाशी असलेल्या या 16 मुलांनी रडायला सुरुवात केली, तेंव्हा रिक्षाचालक संजय तवटेने अखेर आत्महत्येचाच इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी एका खासगी गाडीतून मुलांना घरी सोडले. पोलिसांच्या या कृत्याबद्दल मिरजेत संताप व्यक्त होत आहे.

  • Share this:

4 ऑगस्ट

मिरज पोलीस ठाण्यात पोलिसांनी निष्पाप मुलांनाच डांबल्याची घटना समोर आली आहे.

ट्रॅफिक पोलिसांनी आज विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एक रिक्षा पकडली. कारवाईसाठी ही रिक्षा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यापूर्वी त्यातील शाळकरी मुलांना सोडून देणे गरजेचे होते. पण पोलिसांनी त्यांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्येच डांबून ठेवले.

मुलांच्या पालकांना संपर्क साधण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. दिवसभर उपाशी असलेल्या या 16 मुलांनी रडायला सुरुवात केली, तेंव्हा रिक्षाचालक संजय तवटेने अखेर आत्महत्येचाच इशारा दिला.

त्यानंतर पोलिसांनी एका खासगी गाडीतून मुलांना घरी सोडले. पोलिसांच्या या कृत्याबद्दल मिरजेत संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading