महाविकास आघाडीला धक्का, शपथविधीच्या आधी नेत्याची नाराजी उघड

महाविकास आघाडीला धक्का, शपथविधीच्या आधी नेत्याची नाराजी उघड

मंत्रिमंडळ विस्ताराला महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापन झाल्यानंतर आता अखेर महिन्याभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराला महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मित्रपक्षाच्या नेत्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.

'मित्रपक्षातील कोणत्याही नेत्याला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार नाही. आगामी काळात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित करू,' अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

LIVE : मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

दुसरीकडे, शेकापचे नेते जयंत पाटील हेदेखील नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद तर नाहीच, पण या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात ने आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही अजित पवारांकडे?

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्याबराेबरच गृह खात्याची जबाबदारीही दिली जाऊ शकते.

शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून युवासेनाप्रमुखांची मंत्रिपदी वर्णी लागणार

दुसरीकडे, बच्चू कडूंची लाॅटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल रिपब्लिक पार्टी, प्रहार संघटना या छोट्या पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत निवडणुका लढवल्या होत्या. परंतु यापैकी आमदार बच्चू कडू वगळता एकाही घटक पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत.

Published by: Akshay Shitole
First published: December 30, 2019, 10:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading