टोमॅटो झाले पेट्रोलपेक्षा महाग, टोमॅटोचा दर 80 रुपयांवर पोहोचला!

टोमॅटो झाले पेट्रोलपेक्षा महाग, टोमॅटोचा दर 80 रुपयांवर पोहोचला!

महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले असून स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले आहेत.

  • Share this:

10 जुलै : महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले असून स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले आहेत. शंभरी गाठल्यामुळे आता टोमॅटो पेट्रोलपेक्षा महाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

सध्या नारायणगाव, मदनफल्ली (आंध्र प्रदेश) आणि नाशिक येथून टोमॅटोची आवक आहे. नागपूर बाजार समितीत ५० ते ६० रुपये घाऊक भाव असला तरी किरकोळ विक्रेते दुपटीने विक्री करीत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो; परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी झाली असून, सरासरी ४०० ते ५०० वाहनांचीच आवक होत आहे.

First published: July 10, 2017, 2:33 PM IST

ताज्या बातम्या