सिंधू, साक्षी, दीपासह जितू रायला खेलरत्न पुरस्कार जाहीर

सिंधू, साक्षी, दीपासह जितू रायला खेलरत्न पुरस्कार जाहीर

  • Share this:

Khelratna12

22 ऑगस्ट : 'रिओ ऑलिम्पिक 2016'मध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा केंद्र सरकारकडून गौरव करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवणारी 'रुपेरी' कन्या पी व्ही सिंधू, देशाचं पदकांचं खातं उघडणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समधील सगळ्यात कठीण 'प्रोड्युनोव्हा' प्रकार करून जगाचं मन जिंकणारी दीपा कर्मकार आणि नेमबाज जितू राय या चौघांना आज प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 'माण एक्स्प्रेस' ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह एकूण 15 जणांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला 'खेलरत्न' चार क्रीडापटूंना एकत्र दिला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनी हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

ऑलिंपिकमध्ये पी. व्ही. सिंधू हिने रौप्यपदक पटकावत इतिहास घडवला तर साक्षी मलिक हिने कांस्यपदकाला गवसणी घालत पहिल्यांदाच महिलांच्या कुस्तीत पदक मिळवून दिले. या दोघींच्या कामगिरीची दखल घेत त्यांची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅशियम या क्रीडाप्रकारात प्रथमच देशाचं नाव चमकवणार्‍या दीपा कर्माकर तसंच नेमबाज जीतू राय यांचाही खेलरत्नने सन्मान होणार आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राची शाण ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. ललिताने ऍथलेटिकच्या अंतिम फेरीत धडक मारत उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर तिची पुरस्कारासासाठी निवड झाली आहे.

दरम्यान, द्रोणाचार्य पुरस्कारही जाहीर झाले असून दीपा कर्माकरचे प्रशिक्षणक बिश्वेश्वर नंदीना यांच्यासह भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली याचे प्रशिक्षक राज कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

- पी. व्ही. सिंधू - बॅडमिंटन

- दीपा कर्माकर - जिम्नॅस्टिक्स

- साक्षी मलिक - कुस्ती

- जीतू राय - नेमबाजी

अर्जुन पुरस्कार

- ललिता बाबर - ऍथलेटिक्स

- अजिंक्य रहाणे - क्रिकेट

- अपूर्वी चंडेला - नेमबाजी

- सुब्रता पॉल - फुटबॉल

- आणखी 11 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय.

द्रोणाचार्य पुरस्कार

- महाबीर सिंह फोगट - कुस्ती (जीवनगौरव).

(महाबीर यांच्यावरच आमिर खानचा दंगल सिमेना येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.)

- बिश्वेश्वर नंदी - जिम्नॅस्टिक्स ( नंदी हे दीपा कर्माकरचे कोच आहेत.)

- एस. प्रदीप कुमार - स्विमिंग (जीवनगौरव)

- नागापुरी रमेश - ऍथलेटिक्स

- राज कुमार शर्मा - क्रिकेट

- सागरमाल धयाल - बॉक्सिंग

ध्यानचंद पुरस्कार

- सात्ती गीता - ऍथलेटिक्स

- सिल्वॅनस दुंग दुंग - हॉकी

- राजेंद्र प्रल्हाद शेळके - नौकानयन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 22, 2016, 6:43 PM IST

ताज्या बातम्या