अंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ?,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट

अंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ?,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट

आता याच कोल्हापूरमध्ये नव्यानं जनआंदोलन उभं केलं जातंय. अंबाबाई मंदिरातल्या श्रीपूजकांविरोधात...

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

21 जून : राज्यात टोल आंदोलनाची सुरुवात झाली ती पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातून...टोलविरोधात कोल्हापूरकर एकवटले आणि त्यांनी टोलला हद्दपार केलं. पण आता याच कोल्हापूरमध्ये नव्यानं जनआंदोलन उभं केलं जातंय. अंबाबाई मंदिरातल्या श्रीपूजकांविरोधात...याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

करवीरनिवासिनी अंबाबाई....साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. अंबाबाईच्या मंदिरात आता एक वादा सुरू झालाय. देवीची पूजा करणाऱ्या श्रीपुजकांविरोधातला हा वाद आहे. 2 वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. पण तरीही मूर्तीवर पांढरे डाग दिसल्याने कोल्हापूरकरांमध्ये नाराजी आहे. त्यानंतर काही दिवसांतच देवीची घागरा चोळी नेसवून पुजा करण्यात आली आणि कोल्हापूरकरांमध्ये संताप उमटला. संबंधित श्रीपूजकावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण त्यानंतर कोल्हापूरकरांची चळवळ सुरू झाली ती श्रीपूजकांना हटवावं म्हणून..याबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पण निर्णय झालाच नाही.

कोल्हापूरला आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. कोल्हापूरकरांनी एखादा विषय हातात घेतला तर तो ते तडीस लावतातच...आताही श्रीपूजकांना हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा कोल्हापूरकरांनी दिलाय.

या सगळ्या वादाची नेमकी काय कारण आहेत ?

- श्रीपूजकांना मंदिरातून त्वरित हटवावे

- श्रीपूजकांवर मंदिरातल्या संपत्तीबाबत गैरव्यवहाराचा आरोप

- देवीचे दागिने, रक्कम यांचा हिशेब सादर करावा

- गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन त्यांना पुजेचा मान मिळावा

- मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे चित्रीकरण सार्वजनिक करावे

दरम्यान या आंदोलनात महिलाही हिरीरीनं सहभागी झाल्या असून जर ठोस निर्णय झाला नाही तर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन आंदोलन करू असा इशारा जिजाऊ ब्रिगेडनं दिलाय.

कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयाचा चेंडू आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात फेकलाय. विशेष म्हणजे हेच जिल्हाधिकारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षही आहेत.

देवाच्या दरबारात जाणारा भाविक हा सुख समाधान, यश यासाठी जातो..पण याच मंदिरात सुरू झालेल्या या वादामुळे आता भक्तांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण आहे हे नक्की...

First Published: Jun 21, 2017 07:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading