उद्धव ठाकरे जे जेवतात ते दहा रुपयात मिळणार का? नारायण राणेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे जे जेवतात ते दहा रुपयात मिळणार का? नारायण राणेंचा हल्लाबोल

'शिवसेनेने भ्रष्टाचाराविषयी बोलूच नये. त्यांची सर्व कुंडली माझ्याकडे आहे असंही ते म्हणाले.'

  • Share this:

दिनेश केळुसकर, सावंतवाडी 28 डिसेंबर : नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातली लढाई ही आता नवी राहिलेली नाही. राज्यातली भाजपची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करायला नव्याने सुरुवात केलीय. सध्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरू आहे. शिवसेनेचे नेते दिपक सावंत यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला भाजपने जोरदार उत्तर दिलंय. आता नारायण राणे यांनी शिवथाळीवरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचं युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. शिवथाळी ही उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. गरीबांसाठी 10 रुपयात जेवण देण्याची ही योजना आहे. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात या योजनेचा समावेश केला होता. आता खुद्द ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने शिवथाळी योजना राज्यात राबविण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

त्यावरून नारायण राणे यांनी तोफ डागलीय. राणे म्हणाले, उध्दव ठाकरे जे जेवतात तेच जेवण दहा रुपयात देणार का? मुंबई महापालिकेत फक्त कर्मचाऱ्यांसाठी अशी योजना सुरू केली. त्याला 40 रुपये अनुदान दिलं जातं. म्हणजे 50 रुपयात थाळी पडते. सरकार जे अनुदान देतं ते लोकांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून दिलं जातं. शिवसेनेला यातून भ्रष्टाचार करायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेने भ्रष्टाचाराविषयी बोलूच नये. त्यांची सर्व कुंडली माझ्याकडे आहे असंही ते म्हणाले.

अमृता फडणवीसांच्या टीकेचा परिणाम, मुंबई महापालिकाही देणार AXIS BANKला झटका, mumb

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यानी नारायण राणेंसह भाजपाच्या नेत्यांवर कडाडून टिका केलीय. राणेंसह भाजपाच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यानी केलाय. वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकर यानी दिलाय. तर या टिकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी म्हटलय. त्यामुळे 29 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान सुरु झालंय.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे नारायण राणे यांचाही प्रभाव आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर कोकणात राजकीय युद्ध तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणे हे भाजपच्या अधिक जवळ गेले तर विधानसभा निवडणुकीत्या आधी त्यांनी आपला स्वाभिमान हा पक्षच भाजपमध्ये विलीन केला.

भाजपमध्ये असंतोष उफाळला, काँग्रेसमधून आलेला बडा नेता निशाण्यावर

त्यामुळे कोकणात खरा सामना रंगतोय तो राणे विरुद्ध शिवसेना असा. युती तुटल्यानंतर सावंतवाडीत पहिल्यांदाच निवडणूक होतेय. आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 27, 2019, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading