लेकीसोबत शिक्षकाने केले नको ते कृत्य, आईने शाळेत जाऊन चप्पलेनं फोडलं

लेकीसोबत शिक्षकाने केले नको ते कृत्य, आईने शाळेत जाऊन चप्पलेनं फोडलं

शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गाच विकृत मुख्याधापकाने अश्लील चाळे करून तिच्याशी लगट करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 26 डिसेंबर : शिक्षक हा समाजाचा आरसा समजला जातो. परंतु, विद्यार्थी आणि शिक्षकाच्या या नात्याला काळीमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. आपल्याच विद्यार्थिनीशी वर्गात अश्लिल चाळे करणाऱ्या एका मुख्याध्यापकाची पालकांनी येथेच्छ धुलाई केली आहे.

भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गाच विकृत मुख्याधापकाने अश्लील चाळे करून तिच्याशी लगट करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिक आणि पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी विकृत मुख्याध्यापकाला या घटनेचा जाब विचारत चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिसांनी या प्रकरणी तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुख्याध्यापकास गजाआड केले आहे.

प्रमोद नायक (३५) असं विकृत मुख्याधापकाचे नाव आहे.धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत त्या अल्पवयीन विद्याथीनीशी एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकार चौकशीत समोर आला आहे.

गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून या विकृत मुख्याधापकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

भिवंडी - वाडा रोडवरील शेलार गावात हिंदी माध्यमिक शाळा असून या शाळेत १४ वर्षाची पीडिता १० विच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यापासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता. ३ दिवसांपूर्वीच त्याने तिला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याधापक कार्यालयात येण्यास सांगितलं. मात्र, पीडित गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने तिचा वर्ग सुरू असताना शिपाई मार्फत निरोप पाठवून त्याच्या कार्यालयात बोलावलं आणि "मी तुझ्याशी प्रेम करतो असे म्हणून त्याने तिच्याशी वर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

या घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी जावून घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला.आईने नातेवाईकांसह गुरूवारी सकाळी शाळेत धाव घेऊन त्याला गाठलं आणि घडलेल्या प्रकारचा जाब विचारला. मात्र, त्याने उद्धट वर्तन केल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याध्यपकाला ताब्यात घेऊन या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2019, 7:39 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading