'यळकोट..यळकोट...'च्या जयघोषात जेजुरीनगरी दुमदुमली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 10:06 AM IST

'यळकोट..यळकोट...'च्या जयघोषात जेजुरीनगरी दुमदुमली

jejuri4428 मार्च : 'यळकोट यळकोट...जय मल्हार' च्या जयघोषात जेजुरी नगरी दुमदुमुन गेलीय. जेजुरीमध्ये सोमवती यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय. या यात्रेनिमित्त दोन दिवसांपासून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीगडावर येताहेत.

महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या याञा त्यानिमित्ताने राज्यभरातून 2 लाखा पेक्षाही जास्त भाविकांनी कुलदैवताच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरतात. त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे सोमवती अमावस्या... "सदानंदाचा येळकोट' असा खंडोबाचा जयघोष करीत आणि भंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत कऱ्हा तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने, खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना अंघोळ घालण्यात येणार आहे. कालपासूनच खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाची तीव्रता जरी असली तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीय..  आज दुपारी 1 वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने कऱ्हा नदी तीरी सायंकाळी 5 वाजता दाखल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 10:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...