राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; नववर्षाचं जल्लोषात स्वागत

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; नववर्षाचं जल्लोषात स्वागत

  • Share this:

28 मार्च :  आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे या नवीन वर्षाचं स्वागत राज्यभर आनंदाची गुढी उभारुन केलं जात आहे.

पाडव्यानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्याच्या विविध भागात शोभायात्रा रंगणार आहेत.

आज चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आजपासूनच वसंत ऋतूची सुरुवात होते. तेव्हा वसंत ऋतूत होणाऱ्या रंगांची उधळण आजच्या या सणातदेखील बघायला मिळत आहे. अगदी गुढीला चढवलेल्या साडीपासून ते कडुनिंबाची पानं, गुढीला लावलेल्या साखरेच्या रंगीबेरंगी गाठी, झेंडुसोबतच पांढऱ्या लाल फुलांच्या माळा या सगळ्यांमध्ये वसंताचे रंग भरलेले बघायला मिळत आहेत.

आज प्रत्येकाच्या घरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंदाला बहर आला आहे. गुढीपाडव्याच्या आणि या नुतन वर्षाच्या IBN लोकमतच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 08:33 AM IST

ताज्या बातम्या