सहकारी कारखानदारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर !

  • Share this:

fadanvis_win27 मार्च : साखर कारखानदारीच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रातील आपलं राजकारण प्रस्थापित केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेचा मुद्दा छेडत ऩिर्वाणीचा इशारा दिलाय. साखर कारखानदारीचा व्यवसाय पारदर्शी पद्धताने करा, पाहिजे तेवढे सहकार्य करतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपलं नेक्सट टार्गेट सहकारी कारखानदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात आपलं राजकारण सहकाराच्या माध्यमातून प्रस्थापित केलं. याच साखर कारखानदारीतून कालांतराने साखरसम्राट तयार झाले आणि आमदार-खासदार झाले. आता आपण एक नजर टाकूया साखर कारखान्यांच्या आकडेवारीवर...

 

राज्यातील सहकारी साखर कारखाने

- एकूण साखर कारखाने - 227 (नोंदणीकृत)

- सहकारी साखर कारखाने - 178

- खाजगी साखर कारखाने - 49

- सहकारी तत्वावरील विक्री झालेले कारखाने - 27

या सर्व साखर कारखान्यांमध्ये खाजगी तत्वावरील कारखान्यांचा विचार केला तर यापैकी बरेच कारखाने हे पूर्वीचे सहकारी साखर कारखाने आहेत. जे आजारी पडल्याचे दाखवत त्यांची विक्री केली गेली. यामध्ये देखील हजारो कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय.

एफआरपीच्या मुद्यावर साखर कारखाने भाव द्यायला राजी आहेत असं काही चित्र नाही.  किंबहुना आम्ही आमच्या गाळपानुसारच आणि साखरेच्या बाजारभावातील दरानुसार उसाचे दर ठरवतो आणि त्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करतो, अशी भूमिका साखर कारखानदार घेत आहेत. प्रत्यक्षात सरकारनं ठरवून दिलेल्या एफआरपीचा ना शेतकरी संघटना पाठपुरावा करतेय, ना सरकारच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्रीपदावर बसलेले मंत्री करत आहेत.

त्यामुळे कारखान्यांवरचं कर्ज वाढतच गेलंय. दुसऱ्या बाजूला शेतकरीही तितकाच कर्जबाजारी बनत गेलाय. अशा परिस्थितीत कारखानदारांनी पारदर्शक व्यवहार करावा असं मुख्यमंत्री म्हणताहेत. ही सगळी पारदर्शकता साखरेच्या गोडीप्रमाणे कारभारात प्रत्यक्षात कधी उतरणार हा मुळात प्रश्न आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading