आॅस्ट्रेलियाविरोधात भारताला विजयी गुढी उभारण्याची संधी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2017 07:25 PM IST

आॅस्ट्रेलियाविरोधात भारताला विजयी गुढी उभारण्याची संधी

ind_Vs_aus427 मार्च : आॅस्ट्रेलिया विरोधात कसोटी मालिकेत भारताला विजयाची नामी संधी चालून आलीये. धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 106 धावांचं आव्हान ठेवलंय. विजयासाठी भारत फक्त 87 धावा दूर आहे.

धर्मशाळा येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी समान्यात आज चौथा दिवस सुरू आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 300 रन्स केले याचा पाठलाग करता भारताने 332 रन्स केले. दुस-या डावा ऑस्ट्रेलियाकडून खराब खेळा सुरूवात झाली. अखेरीस धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलिया 137 धावांवर ऑल आऊट झालीये.  ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 106 धावांचं आव्हान    ठेवलं आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं बिनबाद 19 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी हव्यात केवळ 87 धावा गरजेच्या आहेत. त्यामुळे  धर्मशाला कसोटीत भारत विजयाची गुढी उभारणार? हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...