खारघर टोल घोटाळ्याची चौकशी 3 महिन्यात पूर्ण करा - हायकोर्ट

खारघर टोल घोटाळ्याची चौकशी 3 महिन्यात पूर्ण करा - हायकोर्ट

  • Share this:

kharghar

27 मार्च : नवी मुंबई येथील खारघर टोल निविदेतील घोटाळ्याची खुली चौकशी ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणात ३९० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी प्राथमिक चौकशी झालेली असताना खुल्या चौकशीची गरजच काय, असा सवाल करत ही खुली चौकशी म्हणजे टाळाटाळ करण्याचाच प्रकार असल्याचे ताशेरे न्यायालयाने गेल्या सुनावणी वेळी ओढले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आली असून खुल्या चौकशीची गरजच काय, असा सवाल न्यायालयाने केला होता.

निविदा प्रक्रियेच्या नियमांना हरताळ फासत खारघर टोलवसुलीचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप प्रवीण वाटेगावकर यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे.

खुली चौकशी पूर्ण करू, तसेच गरज भासल्यास कंत्राटदारावर गुन्हा नोंद करू, अशी माहिती एसीबीच्या वकिलांनी हायकोर्टात दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 03:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading