यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, स्कायमेटचं भाकित

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2017 03:06 PM IST

506513982-monsoon1_6

27 मार्च :  वर्षानुवर्षांची नापीकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा यांमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजासाठी पुन्हा एक दु:खदायी बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असेल. तर देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये 1टक्के पाऊस होऊ शकतो. यामध्ये 70 टक्के शक्यता सामान्य पावसाची आहे, 20 टक्के शक्यता सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पावसाची आहे, तर 10 टक्के शक्यता कमी पाऊस होण्याची आहे. जूननंतर जुलैमध्ये 94 टक्के, ऑगस्टमध्ये 93 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

मार्च महिन्यातच तापमानानाने आपले रूप दाखवण्यास सुरूवात केली आहे. ग्रामिण भागात पारा उच्च पातळीवर पोहोचत असून, शरहातही काही वेगळी स्थिती नाही. शरहातही उन्हाचा तडाका वाढला असून, पारा वरचढच आहे. शहरात भविष्याचा विचार करून आतापासूनच पाणीकपात करण्याचा विचार सुरू झाला आहे. तर, ग्रामिण भागात आताच पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या स्थितीतर फारच केविलवाणी आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हैराण आहे. त्यातच त्याला नैसर्गिक आपत्तींचाही फटका बसत आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी पूढे येत आहे. मात्र, विद्यमान राज्य सरकार त्याला फार अनुकूल नाही. सर्व राजकीय पक्षांच्या सुरात सुर मिसळून सत्ताधारीही कर्जमाफीचा मुद्दा बरोबर असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही. त्यामुळे पावसाबाबतच्या बातमीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर ओरखडा उमटला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...