S M L

राष्ट्रपतीपदाबद्दल चर्चा 'मातोश्री'वरच होईल - संजय राऊत

Samruddha Bhambure | Updated On: Mar 27, 2017 03:37 PM IST

sanjay_raut_on_bjp

27 मार्च : गुढी पाडव्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. यावेळी भाजपकडून घटकपक्षांशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भाच चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करायचीच असेल तर ती मातोश्रीवरच होईल, असा पवित्रा सेनेने घेतला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची चिन्हं आहेत.

शिवसेना आणि भाजप यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना भेटून पाडवा निमंत्रण देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र दोन्ही पक्षांचे संबंध सुरळीत असल्याचं सांगत मातोश्रीवर जाण्याचं कोणतेही प्रयोजन नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मातोश्रीवरही उत्तम भोजन आणि पाहुणचार केला जातो, असं सांगत चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. तसंच, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) स्नेहभोजनाच्या चर्चा या फक्त माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र, असे कोणतेही निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुखांना मिळालेलं नाही, असं सांगत स्नेहभोजन राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा आणि स्नेहभोजन फक्त मातोश्रीवरच होईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केसं आहे.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांच्याकडून राष्ट्रपतीपदासाठी अनपेक्षितपणे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचविण्यात आले. उद्धव ठाकरे यांनाही मोहन भागवत राष्ट्रपती व्हावेत असे वाटते. हिंदू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर भागवत यांना राष्ट्रपती करायला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदुत्त्ववादी नेता देशाच्या पंतप्रधानपदी आहे. तर नुकतीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याची निवड करण्यात आल्याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 12:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close