रत्नागिरी जिल्ह्यात 12 गाई-म्हशी पाण्याअभावी मृत्युमुखी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2017 11:06 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात 12 गाई-म्हशी पाण्याअभावी मृत्युमुखी

ratnagiri

27 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खवटी-वरची धनगरवाडी, खालची धनगरवाडी आणि तुळशी-कुबजई या गावांमध्ये पाणी टंचाईनं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यापासून या दोन गावांमधल्या तीन वाड्यांमधील १२ गाई आणि म्हशी पाण्याअभावी तहानेनं व्याकूळ होऊन मृत्युमुखी पडल्या आहेत.या गावामध्ये दीड महिन्यापासून पाणी नाहीये.

गेल्या चार दिवसांपासून या गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय.मात्र दोन दिवसातून एकदा शासनाच्या टँकरचं पाणी पिण्यासाठी मिळतं.मात्र ते पुरेसं नसल्यानं ते सुद्धा पुरत नाहीये.रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या खेड तालुक्यातील वाड्यांना रायगड जिल्ह्याचं दक्षिण टोक असणाऱ्या विन्हेरे गावातून दहा किलोमीटर प्रवास करत विकतचं पाणी आणावं लागतं.एक रुपया लिटर या दराप्रमाणे खासगी विहिरींचं पाणी आणावं लागतंय.मात्र सर्वांनाच हे शक्य होत नाही.

धनगर समाजाचं मुख्य उत्पन्नाचं साधन असणाऱ्या गुरां-ढोरांचा जीव वाचवण्यासाठी ही धडपड इथले गावकरी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...