भाजपचं शिवसेनेसाठीचं अल्टिमेटम तूर्तास मागे

 • Share this:

BJP Shivsena

27 मार्च :  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून राज्यातील नेत्यांना सबूरीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे आधीचं 20 हजार मतं कमी आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची 25 हजार मुल्य असलेली मतं भाजपची अत्यंत महत्वाची आहेत.

जुलैच्या सुरूवातीला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्रपक्षाच्या नेत्यांची बैठकही बोलवली.

युपी आणि उत्तराखंडच्या यशानंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असली, तरी विजयासाठी 20 हजार मुल्य मतं कमी पडत असल्यानं विजयाचा आकडा गाठण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेत्यांनी मातोश्रीवर यावं, असा खासदार संजय राऊत यांचा सूर असल्याचंही सुत्रांकडून कळतं.

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचं गणित

 • एकूण मतदार : 776 खासदार आणि 4 हजार 120 आमदार
 • एकूण मतं :10 लाख 98 हजार 882

  (एका आमदाराच्या मताचं मूल्य आहे :175

  एका खासदाराच्या मताचं मूल्य आहे : 708)

 • बहुमताचा आकडा : 5 लाख 49 हजार 442

---------------------------------------------------------------------------------------

 • एनडीएचं सध्याचं संख्याबळ (सेनेची मतं धरून)  : 5 लाख 24 हजार 890
 • भाजपला किती मतं हवी आहेत  : 24 हजार 552
 • सेना सोबत नसेल तर भाजपला : 50 हजार 445 मतं कमी पडतील

---------------------------------------------------------------------------------------

शिवसेनेच्या मतांचं गणित-

  • शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार आहेत आणि राज्यसभेत 3
  • शिवसेनेचे केंद्रात 21 खासदार आहेत  :

   - एका खासदाराच्या मताचं मूल्य आहे : 708

   म्हणजे 708 मूल्य X 21 खासदार = 14 हजार 868 मत

  • शिवसेनेचे राज्यात 63 आमदार आहेत :
  • एका आमदाराच्या मताचं मूल्य आहे 175
  • म्हणजे 175 मूल्य X 63 आमदार = 11 हजार 25

याचाच अर्थ  शिवसेनेच्या खासदारांची एकून 14 हजार 868 मत आणि आमदारांची एकून 11 हजार 25 मतांचं मूल्य एकत्र केलं तर 25 हजार 893 मत होतात आणि याच 25 हजार मतांची भाजपला गरज आहे.

त्यामुळे सध्यातरी भाजपने शिवसेनेच्या मतांवर डोळा ठेवत शिवसेनेला चुचकारण्यास सुरूवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading